कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य पी.डी.मेश्राम यांनी उपस्थित होते.
मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
आज दिनांक 09/02/2026रोजी आलापल्ली येथे सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय येथे
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक श्री खुर्शीद शेख सर व माजी विद्यार्थी सैन्य दलात असलेले प्रमोद गणेश सिडाम व माजी विद्यार्थी अँड. कौस्तुभ गड्डमवार यांनी उपस्थिती दर्शवली त्याचबरोबर मान्यवरांनी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व आदरणीय सर खुर्शीद शेख यांनी भविष्यात विद्यार्थ्यांना येणारी आव्हाने व समस्या याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. बारावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक यांना भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला त्या कार्यक्रमात उपस्थित बारावीचे वर्गशिक्षक तावडे सर यांनी मार्गदर्शन केले व अध्यक्ष यांनी भाषणात विद्यार्थ्यांना भविष्यात येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी शिक्षक व शाळा यांचा समन्वय राखून आपले आदर्श जीवन घडवावे असे प्रतिपादन केले.याप्रसंगी कु. गुरनुले मॅडम, कु.हेमके मॅडम व श्री विशाल चीलवेरवार सर उपस्थित होते व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीश्री.हनुमंत आदे यांनी मोलाचे सहकार्य केले सर्व विद्यार्थ्यांना वर्ग बारावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या व खाऊचे वाटप करून कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी आदर्श राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री खुर्शीद शेख सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आभार श्री धाबेकर सर यांनी मानले
