मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
नवी दिल्ली : साऊथ वेस्ट अमेरिकन संस्थेच्या वतीने Hotel Samrat येथे आयोजित भव्य कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील माजी प्राचार्य रतन दुर्गे यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
अति नक्षलग्रस्त आणि दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्यात गेल्या तब्बल 30 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले आहे. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची ज्योत तेवत ठेवत त्यांनी आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे कार्य केले.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज डॉक्टर, वकील, इंजिनियर तसेच विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत. त्यांच्या या योगदानाची दखल घेत त्यांना मानद डॉक्टरेट बहाल करण्यात आली.
या सन्मानामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राला नवी ओळख मिळाली असून, जिल्ह्यात सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

