कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षणा धिकारी सुनील आईचंवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी : पंचायत समिती अहेरी अंतर्गत बोरी केंद्रातील सेवानिवृत्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा तसेच केंद्रातून स्थानांतरण झालेल्या शिक्षकांचा निरोप कार्यक्रम जि.प. शाळा राजपूर पॅच येथील सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी सुनील आईंचवार होते, तर प्रमुख उपस्थिती मुख्याध्यापिका लक्ष्मी कुसराम यांची होती. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजु आत्राम, लता ठवरे, यशवंत दब्बा, शंकर झाडे तसेच स्थानांतरण झालेले शिक्षक संतोष बद्दीवार, ममता वरखडे, माया पेरगुरवार यांच्यासह सौ. नागमणी शंकर झाडे व सौ. मंगला यशवंत दब्बा उपस्थित होते.
समारंभात सेवानिवृत्त शिक्षकांचा शाल, श्रीफळ, साडी-चोळी देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच बदली झालेल्या शिक्षकांचाही सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.
यावेळी शिक्षक लक्ष्मीनारायण येरकलवार, अनिल चांदेकर, शैला गोरेकर, रविंद्र येमसलवार व शंकर तीम्मा यांनी मनोगत व्यक्त करत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय सेवाकार्याचा गौरव केला व त्यांच्या पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना मुख्याध्यापक तथा प्रभारी केंद्रप्रमुख राजु आत्राम यांनी सेवाकाळातील अनुभव सांगत अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकांचे मिळालेले सहकार्य मोलाचे असल्याचे नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात गटशिक्षणाधिकारी सुनील आईंचवार यांनी राजु आत्राम हे मितभाषी, प्रेमळ व अजातशत्रू व्यक्तिमत्त्व असून त्यांनी बोरी केंद्राची माहिती नेहमी अचूक व वेळेत उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. त्यांच्या अनुभवाचा लाभ पुढील काळातही शिक्षकांना मिळावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका लक्ष्मी कुसराम यांनी केले. संचालन शिक्षक प्रकाश दुर्गे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक पुनम सिडाम यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन जेष्ठ शिक्षक लक्ष्मीनारायण येरकलवार व पुनम सिडाम यांनी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पाडले.
या कार्यक्रमास केंद्रातील मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, विषय शिक्षक व सहशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

