वनसंवर्धन हीच जल व जनसुरक्षा-वनपरीक्षेत्र अधिकारी विलास कोसनकर यांचे प्रतिपादन.
अहेरी =
जंगलाचे संरक्षण म्हणजे नद्या, तलाव, धरणांचे संरक्षण, परिणामी पाण्याचे संवर्धन होय. जंगले वाचली तर आपणास स्वच्छ पाणी, हवा,अन्न व पर्यावरण मिळणार असल्याने जंगलांची सुरक्षा हीच जलसुरक्षा व जल सुरक्षा हीच जनसुरक्षा असल्याचे प्रतिपादन स्थानिक वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाद्वारे आयोजित जागतिक वन दिन कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी नवपरिक्षेत्र अधिकारी प्राणहिता विलास कोसनकर यांनी व्यक्त केले.
जागतिक वन दिन कार्यक्रमाची सुरुवात वन कर्मचाऱ्यांच्या देवलमरी गावात विविध चौकातून विद्यार्थी व वनरक्षक कर्मचारी गावातील नागरिक रॅलीने करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे देवलमरी ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मण कन्नाके सहाय्यक देवलमरी वि एल पेदीवार वनरक्षक समितीचे उपाध्यक्ष महेश लेकरू तसेच वनरक्षक समितीचे अध्यक्ष सुरेश गुंडावार मंचावर उपस्थित होते.
देवलमरी ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मण कन्नाके यांनी प्रास्ताविकतेतून वनाची सर्वसाधारण स्थिती, परिक्षेत्राची चतु:सीमा, वनाचे प्रकार, वर्गवारीनुसार वनक्षेत्र, वनवा लागण्याची कारणे व अति संवेदनशील नियत क्षेत्रांची माहिती विषद केली.
सहाय्यक अहवालानुसार देशात 16 हजार वणवे, गडचिरोली जिल्ह्यात ७२४२ आगीच्या घटना असून वन विभागात 1हजार 148 घटना घडल्याचे सांगितले. वणवे लागण्यात महाराष्ट्र देशात पाचवा तर गडचिरोली राज्यात पहिला असल्याचे सांगितले. यासाठी फायर क्रयू स्टेशन, गावात वनवा मित्र व वन व्यवस्थापन समित्या विभागांच्या दिमितीला असल्याचे सांगितले.
जागतिक वन दिन कार्यक्रम यांनी कवितेतून वणव्याची कारणे विशद केली. कलापथकाद्वारे वन वणवासंबंधी जागृती निर्माण केली. यावेळी भगवंतराव आश्रम शाळा देवमलरी विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच प्राणहिता वनपरिक्षेत्रातील वनरक्षक, वनपाल व इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन एस पी संतोष संपत आभार वनपरिक्षेत्र अधिकारी पेदीवार यांनी केले.
