मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
अहेरी : येथील कमलाताई सुधाकर अलोणे यांची कन्या स्वाती तसेच सुरेंद्र अलोणे यांची भाची यांच्या विवाह सोहळा अहेरी येथील इंडियन फंक्शन हॉलमध्ये मोठ्या उत्साहात, पारंपरिक विधी व आनंदी वातावरणात संपन्न झाला.
विवाह सोहळ्यास नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंगलमय वातावरणात पारंपरिक रीतीरिवाजांनुसार विवाह विधी पार पाडले. वधू-वरांनी एकमेकांना हार घालून आयुष्यभर साथ देण्याचा संकल्प केला. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात नवदांपत्याचे स्वागत करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
या प्रसंगी डॉ. लुबना हकीम यांनी विशेष उपस्थिती दर्शवून नवदांपत्यास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांनी वधू-वरांना आशीर्वाद देत त्यांच्या पुढील वैवाहिक जीवनासाठी सुख, समृद्धी व उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच त्यांनी प्रेमपूर्वक भेटवस्तू प्रदान करून या आनंददायी क्षणात आपला सहभाग नोंदवला.
विवाह सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये अनिल मडावी (वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र देचलीपेठा), निशित गभाने (समुदाय आरोग्य अधिकारी – CHO), मेश्राम सर तसेच स्वप्निल सर (देचलीपेठा) यांचा समावेश होता. उपस्थित मान्यवरांनी अलोणे परिवाराचे अभिनंदन करत नवदांपत्यास आशीर्वाद दिले.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व आनंददायी वातावरणात पार पाडला. उपस्थित सर्वांनी नवदांपत्याच्या उज्ज्वल, यशस्वी व आनंदी वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.

