तहसीलदार तथा मुख्याधिकारी संकुदरवार यांना निवेदन सादर करताना.
मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
सिरोंचा येथील कार्यरत पत्रकार बांधवांसाठी एक हक्काचे व्यासपीठ आणि स्वतंत्र ‘पत्रकार भवन’ असावे, या उद्देशाने राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. संघटनेने सिरोंचा तहसीलदार तथा मुख्या धिकारी संकुदरवार साहेब यांना लेखी निवेदन देऊन शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.तालुक्यातील पत्रकार सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम सातत्याने करत असतात. पत्रकारांच्या विविध बैठका, चर्चासत्र, आणि प्रशासकीय कामकाजासाठी एका सुसज्ज जागेची उणीव भासत आहे. या पत्रकार भवनामुळे पत्रकारांना एकत्र येऊन कामाचे नियोजन करणे सोपे होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.संघटनेच्या वतीने मौजा सिरोंचा येथील सर्वे नंबर ५७ मधील शासकीय जमिनीतून अंदाजे ३५०० स्केअर फूट जागा या पत्रकार भवनासाठी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे.
हे निवेदन देताना राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मधुकर गोंगले गडचिरोली) प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये
सुरेश तिपट्टीवार (तालुका अध्यक्ष)
मुज्जप्फर खान (तालुका उपाध्यक्ष)
शाम बेज्जनवार (सचिव)
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी गडचिरोली आणि तहसीलदार सिरोंचा यांनाही माहितीसाठी सादर करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरात लवकर जागा मंजूर करावी, अशी विनंती पत्रकार संघटनेने केली आहे.

