Sunday, May 24, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

कोणसरी येथील 1995 च्या बॅचचा गेट-टुगेदर ठरला अविस्मरणीय; 30वर्षांनी मित्र-मैत्रिणी पुन्हा एकत्र.

Madhukar gongale by Madhukar gongale
May 24, 2026
in Uncategorized
0 0
0
कोणसरी येथील 1995 च्या बॅचचा गेट-टुगेदर ठरला अविस्मरणीय;  30वर्षांनी मित्र-मैत्रिणी पुन्हा एकत्र.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

जिल्हा परिषद हायस्कूल कोणसरी येथील सन 1995 च्या दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला. तब्बल 30 वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींनी जुन्या आठवणींना उजाळा देत आनंद, हसू, गंमत-जम्मत, नाच-गाणे आणि मैत्रीचा अनोखा सोहळा अनुभवला.
जीवनाच्या धावपळीत अनेक वर्षे लोटली, प्रत्येक जण आपल्या संसारात, नोकरी-व्यवसायात व्यस्त झाला. मात्र, कोणसरी येथे आयोजित करण्यात आलेल्या या गेट-टुगेदरमुळे पुन्हा एकदा शालेय जीवन जिवंत झाल्याची भावना सर्वांच्या मनात निर्माण झाली. “आयुष्यात जो आनंद कधी मिळाला नाही, तो आनंद आज या स्नेहमेळाव्यात मिळाला,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात शिक्षणाच्या आठवणी, वर्गातील खोड्या, शिक्षकांचे मार्गदर्शन, जुन्या मैत्रीचे किस्से यांची रंगतदार चर्चा झाली. मित्र-मैत्रिणी एकमेकांना भेटून भावुक झाले. अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसून आले. “मन भरून मित्रांना पाहत बसावे असे वाटत होते, कार्यक्रम संपवून गावाकडे परत जाण्याचे मनच होत नव्हते,” अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमादरम्यान नाच-गाणे, हास्यविनोद आणि फोटोसेशनने वातावरण आणखी रंगतदार झाले. विशेष म्हणजे, वारंवार विजेचे येणे-जाणे सुरू असतानाही कुणीही कार्यक्रम सोडून जाण्याचे नाव घेत नव्हते. प्रचंड उकाड्यामुळे अंगावरील कपडे घामाने ओले होत होते, तरीही प्रत्येक जण आनंदात रमून गेला होता.
या स्नेहमेळाव्यामुळे पुन्हा एकदा जुनी मैत्री, सुख-दुःखाच्या आठवणी आणि शालेय जीवनातील निरागस क्षण सर्वांच्या मनात ताजे झाले. “देवा, माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना नेहमी आनंदी ठेव,” अशी प्रार्थना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्व मित्रांचे उपस्थितांनी मनापासून आभार मानले. तसेच, भोजनासाठी सन्मानाने निमंत्रित करून मान दिलेल्या मित्रांचे विशेष अभिनंदन

Previous Post

सैनुजी गोटा यांच्या प्रयत्नांमुळे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गट्टा येथे इयत्ता 9 वी व 10 वी वर्गांना मंजुरी.

Madhukar gongale

Madhukar gongale

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In