पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर..
पुणे : दिनांक १६/१०/२०२२ रोजी दिवाळी सणानिमीत्त भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी, धिरज गुप्ता व पोलीस अंगलदार हे पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंगलदार अभिजीत जाधव व राहुल तांबे यांना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडून तडीपार केलेला आरोपी अजिंक्य संतोष काळे, रा. स.नं. २५/२ गणेशनगर, आंबेगाव पठार, पुणे हा नवले पुलाखालील चौकाकडुन कात्रज दिशेने येणारे हायवेवरील चिंतामणी ज्ञानपीठकडे जाणा-या रोडवर थांबला असुन त्याचेकडे पिस्टल व जिवंत काडतुसे आहे.
त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी व तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी नवले पुला खालील चौकाकडुन कात्रज दिशेने येणारे हायवेवरील चिंतामणी ज्ञानपीठकडे जाणा-या रोडवर जावुन पाहणी केली असता, तेथे तडीपार आरोपी अजिंक्य संतोष काळे हा मिळुन आल्याने त्याची अंगझडती घेतली असता, त्याचेकडे एक ३५,०००/- रुपये किंचे गावठी बनावटीचे पिस्टल व एक २००/- रुपये किंचे जिवंत काडतुस मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आले आहे. त्याचेविरूध्द भारती विदयापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ६९० / २०२२, आर्म अॅक्ट कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१)१३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदर आरोपीताचा अभिलेख तपासणी करता तो सहकारनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर २०४ / २०२२ भादंवि कलम ३२६ या गुन्हयामध्ये पाहीजे असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा. राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक
विभाग, मा. सागर पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ – २. मा.श्रीमती. सुषमा चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट, पोलीस निरीक्षक (गुन्हे), विजय पुराणिक, सहा. पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप-निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार, अभिजीत जाधव, राहुल तांबे, नरेंद्र महांगरे, रविंद्र चिप्पा, विश्वनाथ घोणे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अवधुत जमदाडे, सचिन सरपाले, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, मितेश चोरमले, अशिष गायकवाड व विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.