पुणे | एक काळीज पिळवटून टाकणारी घटना पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये घडली. एका सहा वर्षीय मुलाचा (Boy) खेळता-खेळता मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार त्याच्या आईच्या डोळ्यांसमोर घडला. युवान दौंडकर असं या घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे.