नितेश पत्रकार झरि प्रतिनीधी मो. नं 7620029220
झरी: बोपापुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत कार्यालय या साठी तार कपांउड व फेवर ब्लॉक बसविण्याबाबत (GP, कृतिआराखड्यानुसार) जनसेवक वैभव मिलमिले, माझी सरपंच विलास नैताम व ग्रामस्थांनी ग्रामसेवकाला काम त्वरित मंजूर करून आण्याबाबत निवेदन देण्यात आले. आज रोजी जिल्हा परिषद शाळेमध्ये खुप बीकट अशी परिस्थिति निर्माण झाली आहे.सतत पाऊस पडल्याने शाळेतील इमारतीचे खचिकरण होत आहे स्लाप चे पोपडे पडुन जिव हाणी होण्याचा धोका फार मोठ्या प्रमाणात झाला असुन पठांगनात चिखलाचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात झाले आहे.आणि विद्यार्थीना व शिक्षकाला एका वर्गामधुन दुसर्या वर्गाकडे जाण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागत आहे.आज गट ग्रामपंचायत बोपापुर बाळापूर येथील, ग्रामपंचायतीचे सोसायटी, पंचायत समिति च्या निवडणूका या जिल्हा परिषद शाळेमध्ये घेतल्या जातात. आज शाळा म्हणजे शिक्षणाचे मंदिर आहे आणि शाळेची ची अवस्था खुप बीकट असल्याने विद्यार्थीला त्रास सहन करावा लागत आहे, शाळेला व ग्रामपंचायतीला काम त्वरित मंजुर करून आणा वे या साठी ग्रामसेवकाला निवेदन देण्यात आले.या निवेदनाचा लवकरात लवकर विल्हेवाट लावण्यात यावा जर अशे नाही झाले तर मी जनसेवक वैभव मिलमीले व माझी सरपंच विलास नैताम आणि ग्रामस्थ उपोषण करू अशे त्या निवेदनामध्ये म्हंटले आहे,