पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
हडपसर पोलिस स्टेशन पुणे शहर
पुणे :- मांजरी येथे कोयता हातात घेऊन दहशत माजविणाऱ्या गँगचा बिमोड हडपसर पोलीसांनी केला आहे. राज्यभरात गाजलेल्या कोयता गँगचा बंदोबस्त पोलीसांनी केल्यामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
या गुन्ह्यात यापूर्वी 7 आरोपीना ताब्यात घेतले असून त्यांचेवर यापूर्वीचे कोणतेही गुन्हे दाखल नव्हते मात्र गुन्हा घडल्यापासून गुन्ह्यातील मुख्य सराईत आरोपी पळून गेले होते.मुख्य आरोपी समीर पठाण, शोएब पठाण, गणेश उर्फ दादा
हवालदार हे गुन्हा दाखल झालेपासून फरार झाले होते. आरोपी हे वेळोवेळी आपले राहण्याचे ठिकाण हे बदलत होते. ते गुन्हा दाखल झालेपासून भोर, सांगली, कोल्हापूर, बारामती असे वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असलेबाबत तांत्रिक माहीती प्राप्त होत होती.
आरोपी गणेश उर्फ दादा हवालदार हा कामठघर, भिवंडी जिल्हा ठाणे येथे असल्याबाबत तांत्रिक माहिती प्राप्त झाल्याने तपासपथाकाचे पोलीस अंमलदार समीर पांडुळे, निखील पवार, प्रशांत दुधाळ यांची तपास टिम जावून त्यांनी केले तपासामध्ये आरोपी गणेश ऊर्फ दादा हवालदार यास दिनांक 23/12/2022 रोजी पहाटेच्या वेळेस ताब्यात घेतले.
तसेच पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार शाहीद शेख, प्रशांत टोणपे, अतुल पंधरकर यांच्या तपास टिमने दातरंगे मळा, नालेगाव जिल्हा अहमदनगर याठिकाणी कारवाई करून आरोपी तपास टिमला पाहून पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून आरोपी समिर पठाण व शोएब पठाण यांना दिनांक 23/12/2022 रोजी सकाळी ताब्यात घेतले.
हडपसर पोलीसांनी केलेल्या तपासात एकाच दिवशी भिवंडी ठाणे व नालेगाव, अहमदनगर या भागात कारवाई करून 1 ) समिर लियाकत पठाण वय 26 वर्ष रा. गोपाळपट्टी मांजरी पुणे 2) शोएब लियाकत पठाण वय 22 वर्ष रा. गोपाळपट्टी मांजरी पुणे 3) गणेश ऊर्फ दादा विठ्ठल हवालदार वय 22 वर्ष रा. महादेवनगर हडपसर पुणे यांना अटक केली. वरील 3 अटक आरोपी यांचे हडपसर परिसरात मागील 7 वर्षापासून गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे हडपसर पोलीसांनी या गुन्हामध्ये आज रोजी पर्यंत एकुण 10 आरोपी यांना अटक केली आहे.
सादर कामगिरी तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशिल लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, समिर पांडुळे, शाहीद शेख, निखील पवार, प्रशात दुधाळ, प्रशांत टोणपे, अतुल पंधरकर, सचिन गोरखे, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

