पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर
पूणे :- दि. १९ / १२ / २०२२ रोजी हडपसर पुणे परीसरात बांबु व ताडपत्रीचे उघडे शेड मध्ये काही इसम बेकायदेशीरपणे जुगार खेळत व खेळवत असलेबाबत प्राप्त झालेल्या गोपनिय बातमीदार मार्फतीने खात्रीशीर बातमी मिळाली.
सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अगंलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवून छापा टाकला असता काही इसग बेकायदेशीर पैसे लावुन जुगार खेळत व खेळवत असल्याचे मिळुन आल्याने १३ इसमांना ताब्यात घेवुन, त्यांचेकडुन रोख रक्कम, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकुण ४०,०४०/- रू.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर प्रकरणी जुगार खेळताना मिळुन आलेले १३ इसम व एक पाहिजे आरोपी अशा १४ इसमांविरूध्द हडपसर पोलीस स्टेशन येथे गुरनं. १६१३ / २०२२ महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता हडपसर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार तसेच सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंगलदार, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे आण्णा माने, मनिषा पुकाळे, पुष्पेंद्र चव्हाण, अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे..

