पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
लोणीकाळभोर पोलीस ठाणे, पुणे शहर.
पुणे :- लोणीकाळभोर पोलीस स्टेशन तपास पथकातील पो हवा नितीन गायकवाड व पो शि शैलेश कुदळे यांना त्यांचे बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, “तिन इसम हे लोणी रेल्वे स्टेशन या ठिकाणी वसले असुन त्यांच्या मध्ये मर्डर बाबत चर्चा सुरु आहे. त्यांच्या बोलण्यावरुन ते त्यांच्या मित्राचा मर्डर करुन आलेले आहेत. त्याच्या पैकी एकाचे डोक्यावर लाल टोपी आहे” वगैरे माहीती मिळाल्याने त्यांनी सदर बाबत पोउपनि गोरे यांना कळवीले असता पोउपनि गोरे यांनी मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण सो यांना सदर बाबत माहीती कळविली. वपोनि चव्हाण सो यांनी त्या इसमांना सापळा रचुन पकडन्याबाबत मार्गदर्शनपर सुचन्या दिल्याने पोउपनि गोर व तपास पथकातील स्टाफ असे लोणी रेल्वे स्टेशन येथे वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचुन थांबले असता रेल्वे लाइन जवळ तीन इसम हे एकमेकांसोबत चर्चा करत बसले होते. त्यापैकी एकाचे डोक्यावर लाल रंगाची टोपी होती. पोउपनि गोरे व स्टाफ त्यांच्या जवळ गेले असता नमुद तीन इसमांना संशय आल्याने ते इसम तेथुन पळु लागले, त्यावेळी तपास पथकातील स्टाफने त्यांचा पाठलाग करुन नमुद तिन्ही इसमांना शिताफीने ताब्यात घेतले व लोणीकाळभोर पोलीस स्टेशन तपास पथक या ठिकाणी आनुन त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव (१)आदिल इस्माईल शेख (२) मोहम्मद मुजाइद सिद्धीकी (३) नयुम चाँद शेख सर्व रा. मु पो करंजी ता. वसमत जि हिंगोली असे असल्याचे सांगीतले. पोउपनि गोर व स्टाफ यांनी त्या तीन इसमांना विश्वसात घेवून ‘तुम्ही कोणाच्या खुना बद्दल चर्चा करत बसले होता’ असे सांगुन त्याचेकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सांगीतले की, “त्यांनी त्यांच्या गावातील त्यांचा मित्र नामे शाहरुख शुभम शेख याचे सोबत असलेल्या जुन्या भांडणावरुन त्याला दि. २९/१२/२०२२ रोजी रात्री अंदाजे ११/३० वा चे सुमारास नांदगाव ब्रिजजवळ बोलावुन त्यास दारु पाजुन त्याच्या मोटारसायकलला असलेल्या दोरीच्या सह्याने त्याचा गळा आवळुन खुन केला आहे. तसेच त्याची होंडा शाईन मोटारसायकल व शाहरुख याचे अंगावरील कपडे नांदगाव ब्रिज पासून पाच ते सात किलो मीटर पुढे एका छोट्या ब्रिजचे पाईपखाली जाळुन नष्ट केले आहेत” वगैरे माहीती सांगीतली आहे. त्यानंतर पोउपनि गोरे यांनी तात्काळ परभणी पोलीसांशी संपर्क करुन इसम नामे शाहरुख शुभम शेख रा.मु पो करंजी, ता वसमत जि परभणी याचे बाबत चौकशी केली असता आम्हाला खात्रीशीर माहीती मिळाली की, “पुर्णा पोलीस स्टेशन जिल्हा परभणी या ठिकाणी गुर नं ०२/२०२३ भादवि कलम ३०२,२०१ अन्वये इसम नामे शाहरुख शुभम शेख रा.मु पो करंजी, ता वसमत जि परभणी याचा खुन करुन पुरावा नष्ट केले बाबत अज्ञात आरोपीतां विरोधामध्ये गुन्हा दाखल आहे”. आम्ही तात्काळ पुर्णा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री मारकड यांना सदर बाबत माहीती देवुन आरोपी नामे (१) आदिल इस्माईल शेख (२) मोहम्मद मुजाइद सिद्धीकी (३) नयुम चाँद शेख सर्व रा. मु पो करंजी ता. वस्मत जि हिंगोली यांना पुढील कायदेशीर कारवाई कामी पुर्णा पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगीरी मा. रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. संदीप कर्णीक पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. मा.रंजन शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. श्री विक्रांत देशमुख पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५, मा. बजरंग देसाई, सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग, दत्तात्रय चव्हाण वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सुभाष काळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे मार्गदशनाखाली पोउपनि अमित गोरे, पोहवा गायकवाड, पोहवा पाटोळे, पोना नागलीत, पोना जाधव, पोना देवीकर, पोशि पुंडे, पोशि वीर, पोशि कुदळे, पोशि पवार, पोशि सोनवणे यांच्या पथकाने केली आहे.