लोहरा येथे शेतातील 7 क्विंटल कापूस, 4 क्विंटल तुर ची चोरी, पिंपळगाव पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या.

ईसा तडवी पाचोरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पाचोरा:- पिंपळगाव पोलिस स्टेशन हद्दीतून एक चोरीची घटना समोर आली आहे. लोहरा येथील अशोक जैन यांच्या शेतातील 7 क्विंटल कापूस, 4 क्विंटल तुर व एक लोखंडी बोर्ड अज्ञात चोरट्यांनी दि. 7 जानेवारी ते 8 जानेवारी या दरम्यान चोरून नेला. शेतात चोरी झाल्याचे लक्षात येतात अशोक जैन यांनी पिंपळगाव पोलिस स्टेशन मध्ये जाऊन अद्यात चोरा विरोधात तक्रार दाखल केली.

पिंपळगाव पोलिस स्टेशन येथे चोरीची तक्रार प्राप्त होताच दि. 9 जानेवारी रोजी गु. र.न.6/2023 भा. द. वि. 379 अन्वये गुन्हा दाखल केला आणि या घटनेचा तपास सुरू केला. या घटनेचा सखोल तपास करून सदर प्रकरण पोलिसांनी उघडकीस आणून सदर गुन्ह्यात आरोपी अनिल सुतार यास अटक करण्यात आली असून त्यांचेकडून 93 किलो कापूस व 60 किलो तूर हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक एम राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार, पोलिस हवालदार रणजित पाटील, पोलिस कॉन्स्टेबल अमोल पाटील, पोलिस नाईक शिवनारायण देशमुख, पोलिस नाईक शैलेश चव्हाण, पोलिस कॉन्स्टेबल दीपक पाटील यांनी केली आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

AddThis Website Tools
प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

सावनेरला मॉडेल सिटी बनवणार: आमदार डॉ. आशिष देशमुख सावनेर येथे आयोजित आभार सभेत प्रतिपादन.

इंटिग्रेटेड फर्टीलायझर कॉम्प्लेक्स वफेरो अलॉईजचा कारखाना आल्यास या क्षेत्राचे चित्र बदलेल. अनिल अडकिने नागपूर जिल्हा…

10 hours ago

सावंगी ताज आनंदाश्रम येथे प्रार्थना महोत्सव व जन्मोत्सव सोहळा आयोजित.

अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १० जाने:- सावनेर तालुक्यातील…

10 hours ago

राजुरा तालुकास्तरीय नविन्यपूर्ण नवरत्न स्पर्धा संपन्न, जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी जिंकली उपस्थितांची मने.

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 10 जाने:- मनोज गौरकार…

11 hours ago

शिक्षण प्रणाली सुधारणांबाबत शिक्षक व पालकांनी सूचना कराव्या: शालेय शिक्षण राज्यमंत्री भोयर

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा दि.10:- शिक्षण प्रणालीत आमुलाग्र…

11 hours ago

कोरपणा तालुक्यातील मौजा स्मार्ट ग्राम बिबी येथे दोन दिवसीय प्रो- कबड्डी सामन्याचे आयोजन.

संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपणा:- तालुक्यातील मौजा स्मार्ट ग्राम…

11 hours ago