ईसा तडवी पाचोरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पाचोरा:- पिंपळगाव पोलिस स्टेशन हद्दीतून एक चोरीची घटना समोर आली आहे. लोहरा येथील अशोक जैन यांच्या शेतातील 7 क्विंटल कापूस, 4 क्विंटल तुर व एक लोखंडी बोर्ड अज्ञात चोरट्यांनी दि. 7 जानेवारी ते 8 जानेवारी या दरम्यान चोरून नेला. शेतात चोरी झाल्याचे लक्षात येतात अशोक जैन यांनी पिंपळगाव पोलिस स्टेशन मध्ये जाऊन अद्यात चोरा विरोधात तक्रार दाखल केली.
पिंपळगाव पोलिस स्टेशन येथे चोरीची तक्रार प्राप्त होताच दि. 9 जानेवारी रोजी गु. र.न.6/2023 भा. द. वि. 379 अन्वये गुन्हा दाखल केला आणि या घटनेचा तपास सुरू केला. या घटनेचा सखोल तपास करून सदर प्रकरण पोलिसांनी उघडकीस आणून सदर गुन्ह्यात आरोपी अनिल सुतार यास अटक करण्यात आली असून त्यांचेकडून 93 किलो कापूस व 60 किलो तूर हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक एम राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार, पोलिस हवालदार रणजित पाटील, पोलिस कॉन्स्टेबल अमोल पाटील, पोलिस नाईक शिवनारायण देशमुख, पोलिस नाईक शैलेश चव्हाण, पोलिस कॉन्स्टेबल दीपक पाटील यांनी केली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348