पालघर: पैशांचं आमीष देऊन सुरू होते आदिवासींचे धर्मांतर, चौघाणा पोलिसांनी ठोकल्या बेळ्या.

✒️रुपेश उमराणी, मुंबई ब्यूरो चीप
पालघर:-
मुंबई जवळ असलेल्या पालघर मधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. काही पैशांचे लालुच देऊन शेकडो गरीब आदिवासीचे धर्मांतर घडवून आणण्यात येत होते. काही सामाजिक कार्यकर्त्याच्या प्रयत्नाने हा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी पोलिसांनी चौघा जणांना ताब्यात घेतलं. तसंच त्यांच्याविरोधात गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे. डहाणू पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली आहे.

पालघर मधील डहाणूतल्या सावटा येथील काही गरीब, अशिक्षित आदिवासी परिवाराना पैशांचं आमिष देऊन त्यांचे धर्मांतर करण्यासाठी भाग पाडण्यात येत होत. ही बाब निदर्शनास आल्यानंतर काही तरुणांनी याप्रकरणाची दखल घेतली आणि धर्मांतर करण्यासाठी उकसावणाऱ्यांना पोलिसांच्या स्वाधीन केलंय. याप्रकरणी पोलिसांनी कलन 153, 295, 448 आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल करुन घेतला आहे. याप्रकरणी डहाणू पोलिसांकडून चौघांवर गुन्हा नोंदवून घेत आता त्यांची कसून चौकशी केली जातेय.

धर्मांतर करण्यासाठी सांगणाऱ्या चौघांकडेही सावटा या गावामधील काही आदिवासी कुटुंबांतील प्रमुखांची नावं आढळून आली. इतकंच काय तर या कुटुंब प्रमुखांच्या नावे लिफाफ्यात भरलेली काही रक्कमही आढळून आली. या सगळ्या लिफाफ्यासह आणि संशयितांविरोधात तरुणांनी संताप व्यक्त केला आणि त्यांना पोलिसांच्या हवाले केलं. एकूण चार जणांना पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

महाराष्ट्रातील महायुती सरकारची कोंडी, सरकारने आचार संहितेच्या उल्लंघन केल्या बाबत चौकशी सुरू.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…

10 hours ago

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

12 hours ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

1 day ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

2 days ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago