✒️रुपेश उमराणी, मुंबई ब्यूरो चीप
पालघर:- मुंबई जवळ असलेल्या पालघर मधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. काही पैशांचे लालुच देऊन शेकडो गरीब आदिवासीचे धर्मांतर घडवून आणण्यात येत होते. काही सामाजिक कार्यकर्त्याच्या प्रयत्नाने हा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी पोलिसांनी चौघा जणांना ताब्यात घेतलं. तसंच त्यांच्याविरोधात गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे. डहाणू पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली आहे.
पालघर मधील डहाणूतल्या सावटा येथील काही गरीब, अशिक्षित आदिवासी परिवाराना पैशांचं आमिष देऊन त्यांचे धर्मांतर करण्यासाठी भाग पाडण्यात येत होत. ही बाब निदर्शनास आल्यानंतर काही तरुणांनी याप्रकरणाची दखल घेतली आणि धर्मांतर करण्यासाठी उकसावणाऱ्यांना पोलिसांच्या स्वाधीन केलंय. याप्रकरणी पोलिसांनी कलन 153, 295, 448 आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल करुन घेतला आहे. याप्रकरणी डहाणू पोलिसांकडून चौघांवर गुन्हा नोंदवून घेत आता त्यांची कसून चौकशी केली जातेय.
धर्मांतर करण्यासाठी सांगणाऱ्या चौघांकडेही सावटा या गावामधील काही आदिवासी कुटुंबांतील प्रमुखांची नावं आढळून आली. इतकंच काय तर या कुटुंब प्रमुखांच्या नावे लिफाफ्यात भरलेली काही रक्कमही आढळून आली. या सगळ्या लिफाफ्यासह आणि संशयितांविरोधात तरुणांनी संताप व्यक्त केला आणि त्यांना पोलिसांच्या हवाले केलं. एकूण चार जणांना पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.