शिंदे गटाचे 7 जिल्हाप्रमुख बोगस? निवडणूक आयोगामध्ये सादर केलेल्या कागदपत्रांवर ठाकरे गटाचा आक्षेप.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगामध्ये सादर केलेल्या कागदपत्रांवर ठाकरे गटाने आक्षेप नोंदवला आहे.

✒️राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई,17 जाने:- शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाकडे जाणार याचा निर्णय आजही लागला नाही. केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुरू असलेली ही सुनावणी आता शुक्रवारी, 20 जानेवारीला होणार आहे. दरम्यान, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगामध्ये सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचे पुरावे समोर आले आहे. शिंदे गटाचे महेश जेठमलानी यांनी नुकताच निवडणूक आयोगासमोर आम्ही सादर केलेला कागदपत्रांमध्ये कुठलीही त्रुटी नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट यावर काय निर्णय घेतं? हे दोन्ही गटाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे.

शिंदे गटाने सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या एफिडेव्हिटमध्ये माजी विरोधी पक्ष नेता म्हणून विजय चौगुले यांचं नाव आहे. मात्र, शिंदे गटाने सादर केलेल्या खऱ्या शिवसेनेचा दावा केलेल्या यादीत ते जिल्हाप्रमुख म्हणून दाखवण्यात आले आहेत. अशी अनेक नावे या यादीत असल्याचा ठाकरे दावा गटाने केला आहे. यावर निवडणूक आयोगात आक्षेप घेण्यात आला आहे. ठाकरे गटाने 7 जिल्हाप्रमुखांवर आक्षेप घेतले आहेत. राजाभाई केणी, तालुकाप्रमुख पदावर असताना रायगडचे जिल्हाप्रमुख दाखवले. राम चंद्रकांत रघुवंशी, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद यांना नंदुरबारचे जिल्हाप्रमुख दाखवले. किरसिंग वसावे, माजी परिषद सदस्य असताना नंदूरबारच जिल्हाप्रमुख दाखवले. नितीन मते माजी जिल्हाप्रमुख असताना चंद्रपूरचे जिल्हाप्रमुख दाखवले. दत्तात्रय साळुंके, जिल्हा समन्वयक असताना धाराशीवचे जिल्हाप्रमुख दाखवले. तर सुरज साळुंखे, युवा सेना राज्य विस्तारक असताना धाराशीव जिल्हाप्रमुख दाखवले.

दरम्यान, मागील आठवड्यात 10 जानेवारी मंगळवारी यावर दोन्ही बाजूंकडून निवडणूक आयोगात जोरदार युक्तिवाद झाला होता. उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुखपद बेकायदेशीर असल्याचा दावा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून करण्यात आला होता. तर सुप्रीम कोर्टातील सत्ता संघर्षावर निर्णय घेईपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये अशी मागणी ठाकरेंच्या पक्षानं निवडणूक आयोगातील सुनावणीदरम्यान केली होती.

तर, अद्याप कुणालाही अपात्र ठरवलं नाही. धनुष्यबाण कुणाचा हे ठरवण्यात अडथळा नाही. आमदार, खासदारांची आमच्याकडे जास्त संख्या आहे. बहुसंख्येकडे नेणारी आकडेवारी महत्त्वाची आहे. सर्व निकषांवर शिंदे गटच सरस आहे.  शिवसेनेची जुनी घटना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे केंद्रीत होती. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची घटना बदलली आहे.  उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख असे नाव स्वतःसाठी घेतलं मात्र ते शिवसेनाप्रमुख होत नाहीत बाळासाहेबांचे निधन झाल्यावर उद्धव यांनी स्वतःकडे अधिकार घेतले. शिवसेनेच्या घटनेत उद्धव यांनी केलेला बदल बोगस आणि बेकायदेशीर​​ आहे, असा दावा शिंदे गटाने केला होता.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

2 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

13 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

14 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

14 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

14 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

14 hours ago