मुळशी पॅटर्न’ पद्धतीने दगडाने ठेचून इसमाची हत्या, चेहरा दगडाने पुर्णपणे ठेचल्या, ओळख पटविण्यासाठी पोलिसांची दमछक.

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- नाशिक जिल्ह्यामधून एक खळबळ जनक घटना समोर आली आहे. नाशिक शहरामध्ये अवैध व्यवसाय, अमली पदार्थांची विक्री, मारामार्‍या, बलात्कार याच्यासह खुनाच्या घटना दिवसेंदिवस वाढतानाच दिसून येत आहे. अश्यातच आता पंचवटी परिसरात युवकाचा मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र एक मोठी एकच खळबळ उडाली आहे.

एका 35 वर्षीय इसमचा ‘मुळशी पॅटर्न’ पद्धतीने दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. त्या इसमाचा चेहरा दगडाने पुर्णपणे ठेचल्याने त्याची ओळख पटवणे अतिशय अवघड झाले आहे. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू केला मात्र अद्याप त्यांना यश आलेले दिसून येत नाही.
पंचवटी परिसरातील मखमलाबाद रोड जवळील समर्थ नगरच्या समोर हमालवाडी पाटालगत हा मृतदेह आढळून आल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे.

शनिवारी दी.२१ सकाळी पाटाजवळील मोकळ्या पटांगणात एका युवकाचा मृतदेह आढळून आला. या इसमचा अतिशय निर्घृण पद्धतीने खून करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. मारेकर्‍यांनी या इसमचा चेहरा पुर्णपणे दगडाने ठेचून टाकल्याने त्याची ओळखा पटवणे देखील अवघड झाले आहे. मूत व्यक्ति साधारण ३० ते ३५ वयाचा असण्याची शक्यता पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. इसम जवळच्याच वस्तीमधील असण्याची शक्यता व्यक्त करीत, त्याची ओळख पटवण्यासाठी स्थानिक नागरिकांना देखील पाचारण करण्यात आले होते, मात्र चेहऱ्या मोठ्या प्रमाणात छिन्नविछिन्न झालेला असल्यामुळे अद्याप तरी ओळख पटू शकलेली नाही. पोलिसांसमोर या खुनाच्या गुन्हयाची उकल करणे आता मोठे आव्हान असणार आहे. यावेळी सहाय्य पोलीस आयुक्त सीताराम गायकवाड, परिमंडळ 1 उपायुक्त किरणकुमार चव्हाण, युनिट 1 व 2 चे अधिकारी पंचवटी पोलिस ठाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिताराम कोल्हे यांच्यासह अधिकारी कर्मचारी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्र फिरवायला सुरवात केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

5 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

17 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

17 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

17 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

17 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

17 hours ago