मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- नाशिक जिल्ह्यामधून एक खळबळ जनक घटना समोर आली आहे. नाशिक शहरामध्ये अवैध व्यवसाय, अमली पदार्थांची विक्री, मारामार्या, बलात्कार याच्यासह खुनाच्या घटना दिवसेंदिवस वाढतानाच दिसून येत आहे. अश्यातच आता पंचवटी परिसरात युवकाचा मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र एक मोठी एकच खळबळ उडाली आहे.
एका 35 वर्षीय इसमचा ‘मुळशी पॅटर्न’ पद्धतीने दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. त्या इसमाचा चेहरा दगडाने पुर्णपणे ठेचल्याने त्याची ओळख पटवणे अतिशय अवघड झाले आहे. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू केला मात्र अद्याप त्यांना यश आलेले दिसून येत नाही.
पंचवटी परिसरातील मखमलाबाद रोड जवळील समर्थ नगरच्या समोर हमालवाडी पाटालगत हा मृतदेह आढळून आल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे.
शनिवारी दी.२१ सकाळी पाटाजवळील मोकळ्या पटांगणात एका युवकाचा मृतदेह आढळून आला. या इसमचा अतिशय निर्घृण पद्धतीने खून करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. मारेकर्यांनी या इसमचा चेहरा पुर्णपणे दगडाने ठेचून टाकल्याने त्याची ओळखा पटवणे देखील अवघड झाले आहे. मूत व्यक्ति साधारण ३० ते ३५ वयाचा असण्याची शक्यता पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. इसम जवळच्याच वस्तीमधील असण्याची शक्यता व्यक्त करीत, त्याची ओळख पटवण्यासाठी स्थानिक नागरिकांना देखील पाचारण करण्यात आले होते, मात्र चेहऱ्या मोठ्या प्रमाणात छिन्नविछिन्न झालेला असल्यामुळे अद्याप तरी ओळख पटू शकलेली नाही. पोलिसांसमोर या खुनाच्या गुन्हयाची उकल करणे आता मोठे आव्हान असणार आहे. यावेळी सहाय्य पोलीस आयुक्त सीताराम गायकवाड, परिमंडळ 1 उपायुक्त किरणकुमार चव्हाण, युनिट 1 व 2 चे अधिकारी पंचवटी पोलिस ठाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिताराम कोल्हे यांच्यासह अधिकारी कर्मचारी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्र फिरवायला सुरवात केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.