मिर्ची बाबाने महिलेवर केला बलात्कार, मूल होत नाही म्हणून बाबाकडे गेली होती महिला.

महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी
भोपाळ :-
आज देशात स्वयंभू बलात्कारी बाबाचे मोठे पीक आले आहे. अनेक बलात्कारी बाबा जेल मध्ये असून आता त्यात अजुन एका बाबाचा नंबर लागला आहे. मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये एका बाबाला महिलेवर बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेस सरकारच्या काळात या बाबाला राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. या बाबाला आता बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. यामुळे धार्मिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे घटना ?
भोपाळमधील एका महिलेनं मध्यप्रदेशातील प्रसिद्ध मिर्ची बाबा याच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी तक्रारही दाखल करण्यात आली होती. पीडितेनं दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून मिर्ची बाबाला अटक केली आहे. मूल होत नाही म्हणून ही महिला आपली अडचण घेऊन वैराग्यानंद गिरी म्हणजेच मिर्ची बाबा याचा कडे गेली होती. यानंतर या बाबाने त्या महिलेला आपल्या जवळ बोलवलं होतं आणि प्रसाद म्हणून दिलेल्या एका भस्मातून महिलेला बेशुद्ध केलं आणि तिच्यावर रेप केला. या प्रकरणी या बाबाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर कलम 376, 506 आणि 342 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीमध्ये या मिर्ची बाबाच्या गैरकृत्याला विरोध केला होता, असं म्हटलंय. तेव्हा वैराग्यनंद गिरी उर्फ मिर्ची बाबाने या महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेने वैराग्यनंद यांच्या भीतीने आणि समाजात बदनामी होईल या दबावाखाली पोलिसात तक्रार दाखल केली नव्हती. यानंतर पीडित महिलेने अखेर हिंमत करून पोलीस स्थानक गाठलं आणि घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास एफआयआर दाखल केला. त्यानंतर या बाबावर तातडीने कारवाई करत त्याला ग्वालिअरमधून अटक करण्यात आली.

ग्वालियर एसएसपी अमित सांघी यांच्या माहितीनुसार, मिर्ची बाबा रात्री जेव्हा पळत होता तेव्हा पोलिसांनी त्याला सापळा रचून पकडल व त्याचा मोबाईल फोन जब्त केला. तर त्यात अनेक खळबळजनक माहिती समोर आली आहे. मोबाइल फोन मध्ये अनेक पोर्न वीडियो मिळाले. त्याचबरोबर अनेक महिलाचे फोन नंबर मिळाले. ज्याचात पतिचे नाव लिहून त्याच्या समोर ‘बीवी’ लिहून ठेवले होते. पांच नंबर हे देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकाच्या पत्नीच्या नावाने सेव करून होते.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

4 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

4 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

4 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

4 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

5 hours ago

अभिनव विचार मंच तर्फे सोपानदादा कनेरकर यांचा कौटुंबिक प्रबोधन जागर जाणिवांचा कार्यक्रमाचे 25 डिसेंबर रोजी आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…

5 hours ago