महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी
भोपाळ :- आज देशात स्वयंभू बलात्कारी बाबाचे मोठे पीक आले आहे. अनेक बलात्कारी बाबा जेल मध्ये असून आता त्यात अजुन एका बाबाचा नंबर लागला आहे. मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये एका बाबाला महिलेवर बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेस सरकारच्या काळात या बाबाला राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. या बाबाला आता बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. यामुळे धार्मिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे घटना ?
भोपाळमधील एका महिलेनं मध्यप्रदेशातील प्रसिद्ध मिर्ची बाबा याच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी तक्रारही दाखल करण्यात आली होती. पीडितेनं दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून मिर्ची बाबाला अटक केली आहे. मूल होत नाही म्हणून ही महिला आपली अडचण घेऊन वैराग्यानंद गिरी म्हणजेच मिर्ची बाबा याचा कडे गेली होती. यानंतर या बाबाने त्या महिलेला आपल्या जवळ बोलवलं होतं आणि प्रसाद म्हणून दिलेल्या एका भस्मातून महिलेला बेशुद्ध केलं आणि तिच्यावर रेप केला. या प्रकरणी या बाबाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर कलम 376, 506 आणि 342 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीमध्ये या मिर्ची बाबाच्या गैरकृत्याला विरोध केला होता, असं म्हटलंय. तेव्हा वैराग्यनंद गिरी उर्फ मिर्ची बाबाने या महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेने वैराग्यनंद यांच्या भीतीने आणि समाजात बदनामी होईल या दबावाखाली पोलिसात तक्रार दाखल केली नव्हती. यानंतर पीडित महिलेने अखेर हिंमत करून पोलीस स्थानक गाठलं आणि घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास एफआयआर दाखल केला. त्यानंतर या बाबावर तातडीने कारवाई करत त्याला ग्वालिअरमधून अटक करण्यात आली.
ग्वालियर एसएसपी अमित सांघी यांच्या माहितीनुसार, मिर्ची बाबा रात्री जेव्हा पळत होता तेव्हा पोलिसांनी त्याला सापळा रचून पकडल व त्याचा मोबाईल फोन जब्त केला. तर त्यात अनेक खळबळजनक माहिती समोर आली आहे. मोबाइल फोन मध्ये अनेक पोर्न वीडियो मिळाले. त्याचबरोबर अनेक महिलाचे फोन नंबर मिळाले. ज्याचात पतिचे नाव लिहून त्याच्या समोर ‘बीवी’ लिहून ठेवले होते. पांच नंबर हे देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकाच्या पत्नीच्या नावाने सेव करून होते.