गुन्हे शाखा युनिट२ ची उलेखनिय कामगिरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या बेतात असलेल्या तरुणास कोयत्यासह केले जेरबंद

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

गुन्हे शाखा युनिट २ पूणे शहर

पुणे :- दि 01/02/2023 रोजी मा. अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. रामनाथ पोकळे सो. यांनी खुन, खुनाचा प्रयत्न, राॅबरी, घरफोडी, चेन्सस्नॅचींग सारख्या गुन्हयांना प्रतिबंध करणे, जास्तीत जास्त गुन्ह्यातील पाहीजे/फरारी आरोपींचा शोध घेऊन त्यांचेवर कारवाई करणे, सोशल मीडियावर दहशत पासविणारे विडिओ प्रसारित करणार्यांचा शोध घेऊन त्यांना प्रतिबंध करणे असे आदेश दिले होते.  त्या अनुषंगाने Unit-2 हद्दीत API वैशाली भोसले, API  विशाल मोहिते व पोलीस हवालदार संजय जाधव,  उज्वल मोकाशी, विनोद चव्हाण , गजानन  सोनुने, मोहसीन शेख, उत्तम तारू, निखिल जाधव, महिला पोलीस हवालदार उकरंडे, साधना  ताम्हाणे असे पेट्रोलिंग करीत असताना के के मार्केट येथे आलो असता, *HC उज्वल मोकाशी व HC संजय जाधव*  यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, बगली हॉस्पिटल ते केके मार्केटच्या दरम्यान असणाऱ्या शंभर फुटी रोडवर बिबवेवाडी येथे एक इसम दखलपात्र गुन्हा करण्याचे बेताने संशयितरित्या थांबला असून त्याचे कबज्यात कोयता आहे, अशी खात्रीलायक बातमी मिळताच  *युनिट 2 चे प्रभारी मा क्रांतिकुमार पाटील सो* याना अवगत करता त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर वरील स्टाफने तात्काळ बातमी ठिकाणी धाव घेत सदर इसमास जागीच पकडून त्यास त्याचे नाव पत्ता विचारता, त्याने आपले नाव *मुशब्बर उर्फ( पापा) शफिक खान वय 21 वर्ष रा. एकबोटे कॉलनी कल्याणकर पुलाजवळ  लोहिया नगर पुणे* असे असल्याचे सांगितले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेता त्याचे पँटच्या आत कंबरेला एक लोखंडी कोयता मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला. चौकशीत त्याने सदरचा कोयता स्व: सौरक्षणार्थ अनाधिकाराने बाळगळ्याचे समक्ष सांगितल्याने त्यास रीतसर ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील कायदेशीर कार्यवाहीकामी *बिबवेवाडी पो.स्टे.* च्या ताब्यात देण्यात आले आहे .
   सदर बाबत *बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.नं.  38    /२०२३ आर्म ऍक्ट ४(२५) मपो अधि ३७(१)(३) सह १३५ प्रमाणे* गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

आरोपीच्या गुन्ह्यांचा पूर्वेतिहासआरोपी मुशब्बर शफिक खान वय 21 वर्ष रा. एकबोटे कॉलनी कल्याणकर पुलाजवळ लोहिया नगर पुणे हा विधिसंघर्षत असताना, त्याच्याविरुद्ध खडक पो स्टे येथे IPC 307 चा गुन्हा दाखल आहे.

👉🏻 सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री. रामनाथ पोकळे सो, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे सो , सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री.सुनील पवार सो. Unit-2 प्रभारी वपोनि श्री. क्रांतीकुमार पाटील सो. यांचे मार्गदर्शनाखाली API वैशाली भोसले, API विशाल मोहिते, पोलीस अंमलदार संजय जाधव , उज्वल मोकाशी , विनोद चव्हाण, गजानन सोनुने ,शंकर नेवसे , मोहसीन शेख, निखिल जाधव, उत्तम तारू, नामदेव रेणुसे, महिला पोलीस हवालदार रेश्मा उकरंडे ,साधना तामानेे व नागनाथ राख या पथकाने केली आहे

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

आता लाडका पत्रकाराचा नंबर लागेल का ! महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लक्ष देतील का ?

देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…

10 hours ago

नाशिक: पती पत्नीने गळफास लावून आत्महत्या, 10 वर्षीय चिमुकली मुलगी सुद्धा पलंगावर मृतावस्थेत.

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…

11 hours ago

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व. शरद काळे यांचा स्मृति दिन साजरा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…

12 hours ago

कवठा येथील सरपंच प्रवीण जायदे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.

खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…

12 hours ago

सिंदी तहसील कार्यालय वर विविध मागण्यासाठी कामगार नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

12 hours ago