नाशिकच्या 6 मुली रात्र कशी काढावी या चिंतेत मग्न, मुख्यमंत्री कार्यालयातून सूत्र हलली व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न मिटला.

नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- पोलीस भरतीसाठी गावाहून मुंबईत आलेल्या तरुणींवर आली दादर स्टेशनवर राहण्याची वेळ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या प्रसंगाची माहिती कळताच सूत्र तत्काळ हलली आणि या सर्व मुलींच्या सुरक्षेसाठी तात्काळ व्यवस्था करण्यात आली.

नाशिक जिल्ह्यातून सहा मुली मुंबईत नायगाव येथे पोलीस भरती परीक्षेला आल्या होत्या. मात्र दुर्दैवाने पोलीस भरती प्रक्रिया सुरू असलेल्या ठिकाणी म्हणजेच नायगाव येथे त्यांच्या राहण्याची जागा अचानक नाकारण्यात आली. जागा तुडुंब भरली असल्याने तेथून त्यांना सकाळपर्यंत परतवण्यात आले. पण कुठे राहायचे हे त्यांना सांगितले जात नव्हते. या बिचार्‍या सहा मुली तेथे खूप वेळ वाट बघत होत्या पण त्यांना कोणतीच मदत मिळाली नाही.

सायंकाळच्या वेळेस नायगाव पोलीस भरती ग्राउंडवर त्यांची राहण्याची सोय नाकारण्यात आली, त्यानंतर कोणीतरी त्यांच्याकडून गेस्ट रूम मध्ये राहण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली, इतके पैसे नसल्याने या मुली पुन्हा एकत्र दादर स्टेशन परिसरात आल्या. तेथे बसल्या व आजची रात्र कुठे घालवायची या विचाराने चिंतित झाल्या. त्या दादर प्लॅटफॉर्म बाहेर असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलला विचारलं असता त्यांनीही चौकशी केली पण त्यांना प्लॅटफॉर्मवर असलेल्या विश्रामगृहात फक्त दोन तासांसाठी राहता येईल असे सांगण्यात आले.

त्याच वेळेस तेथून जाणाऱ्या एका महिला पत्रकार अस्मिता यांनी हा प्रकार पाहिला. या मुलींची विचारपूस केली असता हा सर्व प्रकार त्यांना समजला, त्यांनी तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला मात्र त्यांचा फोन व्यस्त असल्याने थेट वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी फोन करण्यात आला. तेथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सचिव अमित बराटे हे होते, त्यांनी हे सगळं ऐकताच ताबडतोब स्टेशन मास्तर अमित खरे व डेप्युटी स्टेशन मास्तर पाण्डेय यांच्याशी फोनवर संवाद साधत या सहा मुलींना रात्री सुखरूप राहण्यासाठी व विश्रांतीसाठी महिला वेटिंग रूम मध्ये तात्काळ व्यवस्था करण्यास सांगितले.

या सहा मुलींना सुरक्षेचं कवच म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे सचिव अमित बराटे कर्तव्यात खरे उतरले. या सहा मुली व त्यांचे आई वडील हे ऐकून निर्धास्त झाले व त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सचिव अमित बराटे व रेल्वे स्टाफ यांचे मनःपूर्वक आभार मानले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहेत असे या मुलींनी व त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आता लाडका पत्रकाराचा नंबर लागेल का ! महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लक्ष देतील का ?

देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…

11 hours ago

नाशिक: पती पत्नीने गळफास लावून आत्महत्या, 10 वर्षीय चिमुकली मुलगी सुद्धा पलंगावर मृतावस्थेत.

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…

11 hours ago

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व. शरद काळे यांचा स्मृति दिन साजरा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…

12 hours ago

कवठा येथील सरपंच प्रवीण जायदे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.

खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…

12 hours ago

सिंदी तहसील कार्यालय वर विविध मागण्यासाठी कामगार नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

12 hours ago