प्रेम प्रकरणातून जळगाव जिल्ह्यात घडले दुहेरी हत्याकांड, भावनेचं बहिणीची आणि प्रेमीची केली हत्या.

विश्वास वाडे चोपडा तालुका प्रतिनिधी
जळगाव/चोपडा:-
प्रेमी युगुलाच्या दुहेरी हत्याकांड जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथून समोर आले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला हादळला आहे. सर्वीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे. एका मुलाला गोळी मारुन ठार मारण्यात आलं. तर मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आली.

चोपडा शहराजवळ असलेल्या जुना वराड शिवारात दोघांचे मृतदेह आढळून आल्यानंतर हे संतापजनक घटना समोर आली. राकेश संजय राजपूत असं गोळी घालून हत्या कऱण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे, तर वर्षा समाधान कोळी असं मुलीचं नाव आहे. राकेशचं वय 22 वर्ष असून वर्षा 20 वर्षां होती. या हत्याकांडप्रकरणी पोलिसांना दोघा संशयितांना ताब्यात घेतलंय. तर इतर दोन संशयित आरोपींचा शोध सुरु आहे.

सख्खा भाऊ निघाला हत्यारा.
राकेश आणि वर्षा यांच्यात एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे. ते हसत हसत आपला नवीन संसाराचे स्वप्न बघत होते. त्यांना माहीत होते आपल्या प्रेमाला घरचे राजी होणार नाही. त्यामुळे ते पळून जाणार होतो. याबाबत वर्षाच्या भावाला कळल्यानंतर त्यानं दोघांचीही हत्या केली. वर्षा हिच्या अल्पवयीन भावाने आधी राकेशच्या डोक्यात गोळी झाडली आणि त्यानंतर बहिणीची गळा दाबून हत्या केली. त्याआधी दोघांना बाईकवरुन बसून आणण्यात आलं होतं.

वर्षाच्या लहान भावासह इतर तीन जणांनी राकेश आणि वर्षा या दोघांना बाईकवरुन चोपडा ते वराडे मार्गावर असलेल्या नाल्याजवळ आणलं होतं. तिथं या दोघांची हत्या करण्यात आली. लहान भावाने बहिणीचा रुमालाने गळा दाबला आणि तिची हत्या केली. याघटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात गेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले आहेत. हत्या करण्यात आलेल्या प्रेमी युगुलाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून तणावपूर्ण वातावरण आहे.

बंदूकसह पोलिसांसमोर सरेंडर
आपल्या रक्ताच्या बहिणीसह तिच्या प्रेमाची निर्घृण हत्या केल्यानंतर सख्खा भाऊ पोलीस स्टेशनमध्ये स्वतःहून हजर झाला बंदूकसह हजर झालेल्या एका अल्पवयीन मुलाने आपण दोघांचा खून केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी भावाने दिलेल्या माहितीच्या आधारे पाहणी केली असता त्यांना दोन मृतदेह आढळून आले. त्यात मुलाला गोळी झाडण्यात आलेली होती, तर मुलीचा गळा दाबून हत्या करण्यात आलेली होती, हेही स्पष्ट झालं. आता सध्या चोडपा शहर पोलीस या दुहेरी हत्याकांडप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

मिरा भाईंदर: माणसाला माणूस बनवण्याचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे वर्षावास: भदंत शांतिरत्न यांचे प्रतिपादन.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…

5 hours ago

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना वाहली श्रद्धांजली.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…

5 hours ago

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…

6 hours ago

पुलगाव येथे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा माल जप्त.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…

6 hours ago

सांगली सेवक कामगार संघटने कडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाबत घेतली भूमिका.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…

6 hours ago

चंद्रपूर: वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…

7 hours ago