विश्वास वाडे चोपडा तालुका प्रतिनिधी
जळगाव/चोपडा:- प्रेमी युगुलाच्या दुहेरी हत्याकांड जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथून समोर आले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला हादळला आहे. सर्वीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे. एका मुलाला गोळी मारुन ठार मारण्यात आलं. तर मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आली.
चोपडा शहराजवळ असलेल्या जुना वराड शिवारात दोघांचे मृतदेह आढळून आल्यानंतर हे संतापजनक घटना समोर आली. राकेश संजय राजपूत असं गोळी घालून हत्या कऱण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे, तर वर्षा समाधान कोळी असं मुलीचं नाव आहे. राकेशचं वय 22 वर्ष असून वर्षा 20 वर्षां होती. या हत्याकांडप्रकरणी पोलिसांना दोघा संशयितांना ताब्यात घेतलंय. तर इतर दोन संशयित आरोपींचा शोध सुरु आहे.
सख्खा भाऊ निघाला हत्यारा.
राकेश आणि वर्षा यांच्यात एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे. ते हसत हसत आपला नवीन संसाराचे स्वप्न बघत होते. त्यांना माहीत होते आपल्या प्रेमाला घरचे राजी होणार नाही. त्यामुळे ते पळून जाणार होतो. याबाबत वर्षाच्या भावाला कळल्यानंतर त्यानं दोघांचीही हत्या केली. वर्षा हिच्या अल्पवयीन भावाने आधी राकेशच्या डोक्यात गोळी झाडली आणि त्यानंतर बहिणीची गळा दाबून हत्या केली. त्याआधी दोघांना बाईकवरुन बसून आणण्यात आलं होतं.
वर्षाच्या लहान भावासह इतर तीन जणांनी राकेश आणि वर्षा या दोघांना बाईकवरुन चोपडा ते वराडे मार्गावर असलेल्या नाल्याजवळ आणलं होतं. तिथं या दोघांची हत्या करण्यात आली. लहान भावाने बहिणीचा रुमालाने गळा दाबला आणि तिची हत्या केली. याघटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात गेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले आहेत. हत्या करण्यात आलेल्या प्रेमी युगुलाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून तणावपूर्ण वातावरण आहे.
बंदूकसह पोलिसांसमोर सरेंडर
आपल्या रक्ताच्या बहिणीसह तिच्या प्रेमाची निर्घृण हत्या केल्यानंतर सख्खा भाऊ पोलीस स्टेशनमध्ये स्वतःहून हजर झाला बंदूकसह हजर झालेल्या एका अल्पवयीन मुलाने आपण दोघांचा खून केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी भावाने दिलेल्या माहितीच्या आधारे पाहणी केली असता त्यांना दोन मृतदेह आढळून आले. त्यात मुलाला गोळी झाडण्यात आलेली होती, तर मुलीचा गळा दाबून हत्या करण्यात आलेली होती, हेही स्पष्ट झालं. आता सध्या चोडपा शहर पोलीस या दुहेरी हत्याकांडप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.