पुणे जिल्हात बारावीच्या परीक्षेत विद्यार्थी करत होते सामूहिक कॉपी; परीक्षा केंद्र संचालकांसह 9 शिक्षकांवर गुन्हे दाखल.

वैशाली गायकवाड, उपसंपादक (पुणे)

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- जिल्हातील दौंड तालुक्यातील केडगाव येथून एक खळबजनक घटना समोर आली आहे. येथील एका परीक्षा केंद्रात बारावी बोर्डाचे परीक्षा सुरू असताना विद्यार्थी सामूहिकरित्या कॉपी करत असताना आढळून आले. या विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास मदत केल्याप्रकरणी परीक्षा केंद्र संचालकांसह 9 शिक्षकांवर यवत पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

सध्या संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वपूर्ण असलेली दहावी व बारावीची परीक्षा सुरू आहे ही परीक्षा कॉपीमुक्त व्हावी म्हणून शासन स्तरावर मोठी काळजी घेण्यात येत आहे. पण कुठे कुठे कॉपी मुक्त अभियानाला गालबोट लावण्याच्या घटना समोर येत आहे. अशीच घटना केडगाव येथील जवाहर विद्यालय असणाऱ्या परीक्षा केंद्रातून समोर आली आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या भरारी पथकाने केडगाव येथील जवाहर विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय परीक्षा केंद्रात भेट दिली असता सदर प्रकार उघडकीस आला. भरारी पथकाचे प्रमुख व विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांनी याबाबतची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली आहे.

सोमवार दिनांक 27 रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या भरारी पथकाने दुपारी 12 वाजताच्या सुमारास केडगाव येथील जवाहर विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील बारावीची परीक्षा केंद्र क्रमांक 193 येथे अचानक भेट दिली. तेव्हा परीक्षा काॅपीमुक्त न करता, विद्यार्थ्यांना सामूहिक काॅपी करण्यासाठी प्रतिबंध न करता, त्यांची अंगझडती न घेता, त्यांना काॅपी करण्यासाठी उत्तेजन देऊन अप्रत्यक्ष सहाय्य केले. याप्रकरणी यवत पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र प्रेवेंशन ऑफ मॅन प्रॅक्टिसेस अँड युनिव्हर्सिटी बोर्ड, एक्झामिनेशन ऍक्ट 1982 कलम 8 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हा हा परीक्षा केंद्र संचालक उपसंचालक व इतर शिक्षक असे एकूण नऊ जणांवर दाखल करण्यात आलेला आहे.

आरोपी परीक्षा केंद्र संचालक जालींदर नारायण काटे, उपकेंद्र संचालक रावसाहेब शामराव भामरे, शिक्षक प्रकाश कुचेकर, विकास दिवेकर, शाम गोरगल, कविता काशीद, जयश्री गवळी, सुरेखा होन, अभय सोडनवर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यवत पोलीस करत आहे.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

12 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

24 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

24 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

24 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

1 day ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

1 day ago