विकासीत महाराष्ट्रात गर्भवती महिलेला ब्लँकेटच्या झोळीतून रुग्णालयात नेण्याची वेळ.

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:-
जिल्हातून एक खळबळजनक बातमी समोर आले. महाराष्ट्रातील रस्त्ये किती चांगले आहे हे सर्वांना पडलेलं कोड आहे. ते किती लोकांचे जीव घेणार हे समजण्या पलीकडे आहे.

आज राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे जनजीवन सर्वीकडे विस्कळीत झाले आहे. रस्त्याचे तर तीन तेरा वाजले आहे. त्यामुळे एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदपाडा गावातील आहे. एका गर्भवती महिलेला रुग्णालयापर्यंत नेण्याकरिता तीच्या कुटुंबियाना अशी पायपीट करावी लागली. शुक्रवारी हेदपाडा या गावातील वैशाली सोमनाथ बेंडकोळी महिलेला 9 महिने पूर्ण झाल्याने प्रसुती कळा सुरू झाल्या. रस्त्यांच्या समस्येमुळे या गर्भवती महिलेला झोळीतून 3 किलोमिटर पायपीट करत मुख्य रस्त्यावर घेऊन यावं लागलं. मुख्य रस्त्यापासून 8 किलोमिटर असलेल्या अंबोली येथील शासकीय रुग्णालयात या महिलेने कन्यारत्नाला जन्म दिला. 300 लोकवस्ती असलेल्या हेदपाडा गावात दरवर्षी पावसाळ्यात रस्त्याच्या गंभीर समस्या उद्भवते. पावसाळ्यात हा रस्ता इतका चिखलमय होतो की त्यावरून दुचाकी नेणंही कठीण होतं. असुविधेमुळे होणारी ही अशी फरफट आता इथल्या नागरिकांना नेहमीचीच झाली आहे. आता आणखी किती वर्ष असा अंत पाहिला जाणार असा उद्विग्न प्रश्न इथले लोक विचारू लागलेत.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…

15 mins ago

पुलगाव येथे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा माल जप्त.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…

33 mins ago

सांगली सेवक कामगार संघटने कडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाबत घेतली भूमिका.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…

54 mins ago

चंद्रपूर: वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…

1 hour ago

विधानसभा निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर आढळल्यास नागरिकांनी तत्काळ माहिती द्यावी, आयकर विभागाचे आवाहन.

निवडणुकीतील काळ्या पैशाबाबत नागरीक करू शकतील थेट आयकर विभागाकडे तक्रार; टोल-फ्री क्रमांक, व्हॉट्सॲप किंवा ई…

1 hour ago

मिरज येथील वालनेस हॉस्पिटल (मिशन हॉस्पिटल) येथे होणाऱ्या आंदोलनाला सेवक कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरज:- येथील आरोग्य पंढरीला नाव लवकिक…

1 hour ago