हुतात्म्याच्या समर्पणातून मिळालेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव- साध्वी किरणसुधाजी महाराज

श्याम भुतडा, बीड प्रतिनिधी

बीड:- सहनशीलतेच्या पलीकडे गेलेली परिस्थिती जेव्हा संघर्षाची प्रेरणास्त्रोत होते, चेहरा नसलेली साधारण माणसं जेव्हा त्यांच्या नाकारलेल्या अस्तित्वासाठी पेटून उठतात. त्याग, समर्पण आणि हौतात्म्य ही जेव्हा सामान्य माणसाची जीवनशैली होते व त्यातूनच हुतात्माच्या समर्पणातून मिळालेल्या स्वातंत्र्याची आज प्रकर्षाने आठवण येते. पाहता-पाहता 75 वर्षाचा काळ लोटला जातो आणि त्याच आठवणीची स्मृति पटलावर नोंद होते, त्या आठवणीच्या संचारात माणूस भारावला जातो. असेच वातावरण आज अमृत मंगल कार्यालयात होते.

विषय होता देशाचे साजरे होणारे75 वे स्वातंत्र्य अमृत महोत्सव. यासंदर्भात पूज्य किरणसुधाजी म्हणाल्या, हुतात्मा समर्पित देशासाठी झाला मात्र त्यांनी आंदोलन अहिंसेच्या मार्गाने केले. देश त्यांनी स्वतंत्र केला. देश पारतंत्र्यातून मुक्त झाला तसा आत्मा हा कर्माच्या बेडीतून देहात बंदिस्त झाला आहे, त्यालाही मुक्त करणे आद्य कर्तव्य असून त्यासाठी धर्म आराधनेतून उठाव करावयाचा आहे. नामस्मरणातून जयघोष करावा लागणार आहे म्हणून परमेश्वराची ओळख करायची आहे. कारण या जन्ममृत्यूच्या चक्रात संसार रुपी नौका आडकलेली आहे. आपण त्या नौकेत अडकलेलो आहोत. भगवंताच्या सारथ्यातून ही नौका मुक्त करायची आहे. भगवंत केवळ आपणास त्यातून तारणार आहे. याच भगवंताला केवळ ज्ञान मिळविण्याला साडेबारा वर्षाच्या तपस्यातून अवधी लागला होता. आज त्याच ज्ञानाच्या उपदेशाने आत्म्याला मुक्त करायचे आहे असे त्यांनी सांगितले.

या प्रवचनापूर्वी पूज्य प्रणवमुनींनी आपले विचार मांडले. ते म्हणाले भगवान महावीरांच्या आचरणाविषयी असणार्‍या आचरांग सुत्रात त्यांनी सांगितले की, मुळाशिवाय वृक्षाला आधार नाही, पायाशिवाय घराला मजबुती नाही तसेच योग्य त्या आचरणाशिवाय माणसालाही सुधारणा नाही. सुधारल्यावरच अहिंसेची स्मृती होते. अहिंसा ही केवळ हिंसा करण्यापूर्ती मर्यादित नाही तर ती करता करविता आणि करून घेणारा यांना ही दोषी ठरवते. तिच्या आकलनाने माणूस सुधारतो व सत्कर्माला लागतो, त्यातून आपव्यय व वेळेची बचत होते. असा वेळेचा सदुपयोग करण्यासाठी हा चातुर्मास पर्व आहे. आपण बुद्धिवान आहात, समजूतदार आहात, आपल्या शक्तीचा वापर सत्संगातून, धार्मिक क्रियेतून अध्यात्मालाच आपण करणार आहात. या कार्याला उच्च-नीच, राव-रंक लागत नाही. जीवन प्रत्येकाला जगावे लागते. जीवनाला सुधारणे म्हणजे आत्म्याला सुधारणे होय. रोगाची ओळख झाल्यावर औषधी न मिळणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण होय तत्वत: गुणदोष ओळखून दोषाचे पारिपत्य न करणे म्हणजे आज नाहीतर उद्याही आपणाला आत्म्याला पेचात टाकने होय. म्हणून परमेश्वराला शरण येऊन इंद्रियाच्या सामर्थ्याने आत्म्याची संभावना करणे आवश्यक होय असे त्यांनी सांगितले.

जैन समाजा विषयी असणारी मुंडे परीवाराची आज नीष्टा दिसुन आली पुर्वी गोपीनाथराव मुंडे ही जैनांच्या कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित रहात त्याच संस्कारात आज बीडच्या खासदार डॉक्टर प्रितम ताई मुंडेही चातुर्मास दरबारात अमृत मंगल कार्यालयात साधू साध्वींची दर्शन घेण्यासाठी आल्या त्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले व आपल्या मनोगतात त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी संतांचे मार्गदर्शन मिळाले व आजही त्यांच्या उपदेशाची गरज असल्याचे सांगीतले प्रवचणा पश्चात खासदारांसमवेत साधु, साध्वीनी अमृत महोत्सवातील निघालेल्या पदमात्रेत चालून देशाप्रती असणारी आपलीत्यांनी निष्ठा दाखवली.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

मिरा भाईंदर: माणसाला माणूस बनवण्याचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे वर्षावास: भदंत शांतिरत्न यांचे प्रतिपादन.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…

7 hours ago

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना वाहली श्रद्धांजली.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…

8 hours ago

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…

8 hours ago

पुलगाव येथे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा माल जप्त.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…

9 hours ago

सांगली सेवक कामगार संघटने कडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाबत घेतली भूमिका.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…

9 hours ago

चंद्रपूर: वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…

9 hours ago