9 वर्षाच्या दलित विद्यार्थ्याने माठातील पाणी पिले म्हणून नराधम जातीवादी शिक्षकाने अमानुषपणे मारल्यामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू.

पाणी पिल्यामुळे जातीवादी शिक्षकाने अमानुष रित्या मारल्यामुळे कानाची नस फाटली.

प्रशांत जगताप प्रतिनिधी
राजस्थान:-
भारतात जातीवाद किती भयंकर प्रमाणात आहे याचं ताज उदाहरण राजस्थान राज्यातून समोर आले आहे. जातीवादी शिक्षक सैतानाने 9 वर्षाच्या चिमुकल्या विद्यार्थ्याला अमानुषरित्या मारल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कारण हेच होते की दलित समाजाच्या असलेल्या या 9 वर्षाचा चिमुकल्याने शाळेतील माठा मधील पाणी पिले होते. त्यामुळे जातीवादी नराधमाने शाळाचे शिक्षकांने त्याला अमानुषरित्या मारहाण केली होती. त्यानंरत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ही संतापजनक घटना 20 जुलैची आहे, सुराणा गावातील सरस्वती विद्या मंदिर शाळेतील आहे. जेथे तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या दलित समाजाच्या मुलाने मटक्याला हात लावला त्यामुळे शाळा संचालकाने नाव छैल सिंह या नराधमाने त्या मुलाला अमानुषरित्या मारहाण केली. तो इतक्यावरच थांबला नाही तर जातीवाचक शिवीगाळ पण केली होती त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अहमदाबाद उपचारा दरम्यान मृत्यू.
भारत आपली स्वतंत्रची 75 वर्ष पूर्ण होण्याच्या अमृत महोत्सव साजरा करत आहे. परंतु आज पण जातीवादी मानसिकता पासून स्वतंत्र नाही मिळाले आहे. राजस्थान राज्यातील जालोर मध्ये जातीवादी भेदभाव आणि अस्पश्यतेच्या नावाखाली 9 वर्षाचा दलित समाजाच्या चिमुकल्यांची हत्या करण्यात आली.

ही संतापजनक घटना जालोर जिल्हातील सायला उपखंड क्षेत्रातील सुराणा गावातला आहे. येथे 9 वर्षाचा एक मुलाने शाळेतील मटक्यातील पाणीला हात लावला, तर जातीवादी शैतान असलेल्या शिक्षकाने त्याला अमानुषरित्या मारहाण केली. त्याला इतकं मरल की, त्या मुलाची कानाची नस फटली. हालत गंभीर असल्यामुळे त्या मुलाला उपचारासाठी उदयपुर रेफर करण्यात आले. त्यानंरच्या उदयपुर वरून त्याला अहमदाबाद पाठवण्यात आले होते. काल दि.13 शनिवारला 4 वाजताच्या सुमारास अहमदाबाद येथे रूग्णालयात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पोलिसांकडून प्राप्त माहतीनुसार, आरोपी जातीवादी नराधम शिक्षका विरुद्ध हत्या व SC/ST एक्टच्या कलमानुसार मामला दाखल करन्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा तपास लवकरात लवकर करून आरोपी शिक्षकाला लवकर शिक्षा मिळाली पाहिजे म्हणून या प्रकरणाला केस ऑफिसर स्कीम मध्ये घेण्यात आले आहे.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

महाराष्ट्रातील महायुती सरकारची कोंडी, सरकारने आचार संहितेच्या उल्लंघन केल्या बाबत चौकशी सुरू.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…

10 hours ago

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

12 hours ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

1 day ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

1 day ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago