पाणी पिल्यामुळे जातीवादी शिक्षकाने अमानुष रित्या मारल्यामुळे कानाची नस फाटली.
प्रशांत जगताप प्रतिनिधी
राजस्थान:- भारतात जातीवाद किती भयंकर प्रमाणात आहे याचं ताज उदाहरण राजस्थान राज्यातून समोर आले आहे. जातीवादी शिक्षक सैतानाने 9 वर्षाच्या चिमुकल्या विद्यार्थ्याला अमानुषरित्या मारल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कारण हेच होते की दलित समाजाच्या असलेल्या या 9 वर्षाचा चिमुकल्याने शाळेतील माठा मधील पाणी पिले होते. त्यामुळे जातीवादी नराधमाने शाळाचे शिक्षकांने त्याला अमानुषरित्या मारहाण केली होती. त्यानंरत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ही संतापजनक घटना 20 जुलैची आहे, सुराणा गावातील सरस्वती विद्या मंदिर शाळेतील आहे. जेथे तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या दलित समाजाच्या मुलाने मटक्याला हात लावला त्यामुळे शाळा संचालकाने नाव छैल सिंह या नराधमाने त्या मुलाला अमानुषरित्या मारहाण केली. तो इतक्यावरच थांबला नाही तर जातीवाचक शिवीगाळ पण केली होती त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अहमदाबाद उपचारा दरम्यान मृत्यू.
भारत आपली स्वतंत्रची 75 वर्ष पूर्ण होण्याच्या अमृत महोत्सव साजरा करत आहे. परंतु आज पण जातीवादी मानसिकता पासून स्वतंत्र नाही मिळाले आहे. राजस्थान राज्यातील जालोर मध्ये जातीवादी भेदभाव आणि अस्पश्यतेच्या नावाखाली 9 वर्षाचा दलित समाजाच्या चिमुकल्यांची हत्या करण्यात आली.
ही संतापजनक घटना जालोर जिल्हातील सायला उपखंड क्षेत्रातील सुराणा गावातला आहे. येथे 9 वर्षाचा एक मुलाने शाळेतील मटक्यातील पाणीला हात लावला, तर जातीवादी शैतान असलेल्या शिक्षकाने त्याला अमानुषरित्या मारहाण केली. त्याला इतकं मरल की, त्या मुलाची कानाची नस फटली. हालत गंभीर असल्यामुळे त्या मुलाला उपचारासाठी उदयपुर रेफर करण्यात आले. त्यानंरच्या उदयपुर वरून त्याला अहमदाबाद पाठवण्यात आले होते. काल दि.13 शनिवारला 4 वाजताच्या सुमारास अहमदाबाद येथे रूग्णालयात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पोलिसांकडून प्राप्त माहतीनुसार, आरोपी जातीवादी नराधम शिक्षका विरुद्ध हत्या व SC/ST एक्टच्या कलमानुसार मामला दाखल करन्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा तपास लवकरात लवकर करून आरोपी शिक्षकाला लवकर शिक्षा मिळाली पाहिजे म्हणून या प्रकरणाला केस ऑफिसर स्कीम मध्ये घेण्यात आले आहे.