विक्की डोके लाखांदूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भंडारा:- जिल्हातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला भंडारा जिल्हात बालविवाह लावण्यात येत होता. तारीख वेळ ठरली, जागा पण ठरली मग याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास विभाग भंडारा व चाईल्ड लाईन भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने अल्पवयीन मुलीचे गाव गाठत बाल विवाह रोखण्यात यश आले.
काय आहे घटना…
चाईल्ड लाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर दुपारच्या सुमारास एक गोपनीय कॉल आला. सायंकाळी 7 वाजता मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील गावात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या विवाहाचा घाट घातला जात आहे. हा बालविवाह रोखण्यात यावा. आलेल्या कॉलची पडताळणी करून माहिती खरी असल्याची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर विवाहस्थळी पोहोचून बालविवाह रोखण्यात आला. जिल्हा महिला व बाल विकास विभाग भंडारा व चाईल्ड लाईन भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने अल्पवयीन मुलीचे गाव गाठत बाल विवाह मोडून काढन्यात आला आहे.
काय आहे बाल विवाह..
कायद्यानुसार, एखाद्या मुलाने विशिष्ट वयापर्यंत पोहोचण्यापूर्वी, म्हणजे मूल अद्याप अल्पवयीन असतानाच लग्न केले तेव्हा बालविवाह होतो. हे मुलांच्या मानवी हक्कांना धोक्यात आणते. ज्यामध्ये त्यांचे बालपण त्यांच्यापासून हिरावून घेतले जाते ज्याबद्दल ते पूर्णपणे अनभिज्ञ असतात. त्यांच्यासोबत काय चालले आहे याची त्यांना कल्पना नाही. या प्रथेचा बळी कोवळ्या वयाची मुल ठरतात. कारण या प्रकरणात, केवळ लहान मुलीचे लग्न लहान मुलाशीच होत नाही, तर तिच्यापेक्षा काही वर्षे ज्येष्ठ असलेल्या मोठ्या मुलाशीही तिचे लग्न होते. यामुळे त्यांचे आयुष्यभर मोठे शारीरिक आणि मानसिक परिणाम होतात.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…