संविधान अभ्यासक इंडियन्स सोशल मूव्हमेंट महिला अध्यक्षा सविताताई सोनावणे यांच्या हस्ते ध्वजारोहण
राज शिर्के, मुंबई प्रतिनिधी
मुंबई,दि.15 ऑगस्ट:- मुंबईच्या उपनगर असलेल्या मुलुंडमध्ये अनेक ठिकाणी मिशन संविधान साक्षरता माध्यमातून भारत देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला. त्या प्रसंगी भारतीय संविधान उद्देशिकाचे सार्वत्रिक वाचन घेण्यात आले. भारतीय संविधान नागरिकात रुजविण्याचे महान असे कार्य इंडियन्स सोशल मूव्हमेंटच्या माध्यमातून यावेळी करण्यात आले.
75 वा स्वातंत्र्य दिन मुलुंड मध्ये ठीक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यात वार्ड क्र. 107 मधील दीनदयाळ उपाध्याय रोड, अली बहादुर नगर, विश्वशांती सहकारी सोसायटी, सिद्धार्थ नगर या ठिकाणी संविधान अभ्यासक इंडियन्स सोशल मूव्हमेंट महिला अध्यक्षा सविताताई सोनावणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी इंडियन्स सोशल मूव्हमेंट ईतर कार्यकर्ते, परिसरातील मोठ्या प्रमाणावर होते. सर्वानी मिळुन भारतीय संविधान (प्रत)उदेशिकाचे वाचन करण्यात आले.
भारत हा सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य आहे….
न्याय- सरनाम्याद्वारे भारतीय समाजात राजकीय, सामाजिक व आर्थिक न्याय प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.
स्वतंत्र- घटनेचा सरनामा प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य बरोबरच श्रद्धा व उपासना याचे स्वतंत्रही बहाल करतो.
समता- म्हणजेच दर्जा व संधीची समानता होय.
बंधुता- हे मूल्य समाजातील सदस्यांमध्ये भावनिक बंध आपलेपणाची भावना निर्माण करते.
व्यक्तिप्रतिष्ठा- व्यक्ती कोणत्याही जात, वंश, वर्ग, लिंगाची असो ती मूलतः समान असते.
राष्ट्राचे ऐक्य व अखंडत्व – एकत्वाची भावना हा राष्ट्रनिर्मितीचा व राष्ट्र चिंतन राहण्याचा मूलाधार मानला जातो.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…