श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात अनेक जिल्हात अवकाळी पाऊस कहर केला आहे. त्यात बीड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडाजवळ आलेला घास या पाऊसात वाहून गेला असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. त्यात आता राजकीय भाष्य सुरू आहे.
अवकाळी पाऊसाने नुकसान झालेल्या भागाचा राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी केली. यावेळी विरोधक खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार प्रहार केला. यांना पर्यटन वाटत असेल, होय हे गारपीठ आणि अवकाळी पर्यटनच आहे. गारपीटमुळे झालेलं नुकसान पाहणे हे आमचं पर्यटनच आहे? असे म्हणत अब्दुल सत्तार यांनी संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना म्हटलं आहे. संजय राऊत यांनी अवकाळी आणि गारपीटीला पर्यटन म्हणून वक्तव्य केल्यानं, चर्चेला उधाण आलं होतं. त्याला सत्तार यांनी उत्तर दिले आहे.
बीड जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट झाली. यामुळे पिके नष्ट झाली. शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अवकाळी आणि गारपीटग्रस्त कोळवाडी, धनगरवाडी, पोखरी, पिंपरनई या गावातील नुकसानग्रस्त शेतपिकांची अब्दुल सत्तार यांनी पाहणी केली, यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, की आम्ही शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन अवकाळीची पाहणी करतोय. शेतकऱ्यांचं बांधावर जाऊन दुःख समजून घेतो. हे जर संजय राऊत यांना पर्यटन वाटत असेल, तर होय हे अवकाळी पर्यटनच आहे. आयोध्याला जाणारे पर्यटन नाही, तर पवित्र ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी जावून धनुष्यबाणाचं पूजन करणार आहोत. त्यानंतर जो विरोधकाकडे बाण येईल ते त्याला उत्तर मिळेल, असे म्हणत अब्दुल सत्तार यांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…