बीड येथे जयभिम महोत्सवात थिरकली नृत्य पावले ! राज्यभरातून स्पर्धकांनी नोंदवला सहभाग

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाने अवघ्या राज्याला एक आदर्श घालून दिला आहे. त्या अनुषंगाने येत्या रविवार (दि.९) एप्रिल रोजी खुली नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदरील स्पर्धा बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे पार पडली. या स्पर्धेत स्पर्धकांनी विविध विषयावर नृत्य सादर करीत उपस्थित जनसमुदायाची मने जिंकली.या खुल्या नृत्य स्पर्धेचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीने नियोजनात्मक मोलाचे परिश्रम घेतले.

बीडच्या जयभिम महोत्सवात दरवर्षी विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. त्यामुळे राज्यात एक आगळावेगळा महोत्सव म्हणून बीडचा जयभीम महोत्सव अधोरेखित झाला आहे.त्या अनुषंगाने यंदाही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून खुली नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला उदघाटक म्हणून समाज कल्याण सहाय्यक आयुक्त रविंद्र शिंदे, अध्यक्ष म्हणून उद्धव बनसोडे आदी उपस्थित होते. या खुल्या नृत्य स्पर्धेचे सूत्रसंचालन सुमेध जोगदंड, आभार शरद वांजरे यांनी केले.परीक्षक म्हणून शशी सरवदे, पायल शिंदे यांनी काम पहिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या सुयोग्य नियोजनातून ही स्पर्धा पार पडली. जवळपास शंभर स्पर्धकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. दरम्यान या स्पर्धेला जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.

या स्पर्धकांनी मारली बाजी : खुल्या नृत्य स्पर्धेत समूह नृत्यात प्रथम संस्कृती डान्स ग्रुप, द्वितीय एमएच २३ फलटण डान्स ग्रुप, तृतीय वॉम्पायर डान्स ग्रुपने बाजी मारली. वैयक्तिक नृत्यात मोठ्या गटात प्रथम शुभम बोराडे, अभय जोगदंड, द्वितीय अनामिका अहिरे, साक्षी आंधळे, तृतीय श्वेता अवसरमल, उत्तेजनार्थ प्राची सांगवीकर यांनी क्रमांक पटकवला. लहान गटात प्रथम इशांत गायकवाड,द्वितीय कार्तिक लहाने, माही घोडेवार, तृतीय भक्ती सुरवसे, अनोखी सिरसाट, उत्तेजनार्थ संघवी जोगदंड या स्पर्धकांनी बाजी मारली

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

10 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

21 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

21 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

21 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

21 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

22 hours ago