श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाने अवघ्या राज्याला एक आदर्श घालून दिला आहे. त्या अनुषंगाने येत्या रविवार (दि.९) एप्रिल रोजी खुली नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदरील स्पर्धा बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे पार पडली. या स्पर्धेत स्पर्धकांनी विविध विषयावर नृत्य सादर करीत उपस्थित जनसमुदायाची मने जिंकली.या खुल्या नृत्य स्पर्धेचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीने नियोजनात्मक मोलाचे परिश्रम घेतले.
या स्पर्धकांनी मारली बाजी : खुल्या नृत्य स्पर्धेत समूह नृत्यात प्रथम संस्कृती डान्स ग्रुप, द्वितीय एमएच २३ फलटण डान्स ग्रुप, तृतीय वॉम्पायर डान्स ग्रुपने बाजी मारली. वैयक्तिक नृत्यात मोठ्या गटात प्रथम शुभम बोराडे, अभय जोगदंड, द्वितीय अनामिका अहिरे, साक्षी आंधळे, तृतीय श्वेता अवसरमल, उत्तेजनार्थ प्राची सांगवीकर यांनी क्रमांक पटकवला. लहान गटात प्रथम इशांत गायकवाड,द्वितीय कार्तिक लहाने, माही घोडेवार, तृतीय भक्ती सुरवसे, अनोखी सिरसाट, उत्तेजनार्थ संघवी जोगदंड या स्पर्धकांनी बाजी मारली