मंगेश जगताप, मुंबई प्रतिनिधी
मुंबई:- च्या बोरिवली येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. बोरिवली येथे एक चार मजली इमारत कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या संपूर्ण इमारती मध्ये जवळपास 15 ते 16 परिवार राहत असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.
बोरिवली पश्चिम परिसरात असलेल्या साईबाबा नगरातील गीतांजली इमारत दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळली. दुर्घटनेची तीव्रता बघता त्यात मोठ्या प्रमाणात वित हानी झाल्याचेही समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने घटनास्थळी बचावकार्य सुरू केले आहे. पोलीस, बीएमसीचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे.
साईबाबा नगरातील परिसरातील गीतांजली इमारत ही 30 ते 35 वर्षे जुनी होती. ही इमारत धोकादायक असल्याचं मनपाकडून जाहीर करण्यात आलं होतं. त्यानुसार नागरिकांनी सकाळीच आपले घर खाली केले होते. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. ढिगाऱ्याखाली काहीही नसल्याचे मुंबई पालिका प्रशासनाने सांगितले आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…