वाहतुकीचा कळंबा होऊ नये म्हणून भर पावसात निगडी वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा निचरा करीत बजावले कर्तव्य!

डॅनियल अँथनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी, दि. 4 मे:- पोलीस आपले कर्तव्य बजावत असताना आपण नेहमीच पाहत असतो उन असो कि पाऊस कर्तव्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी नेहमी धावून जात असतात. अनेकदा त्यांच्या या कर्तव्य दक्षतेचे व्हिडिओ अथवा फोटो त्यांच्या नकळत कोणीतरी काढतो आणि ते व्हायरल करतो. असाच एक फोटो आपले कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱी यांचा वायरल झाला आहे. या व्हायरल फोटोचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. व्हायरल फोटोमध्ये भर पावसात महिला पोलीस अधिकारी रस्त्याच्या कडेला पाणी तुंबलेल्या ठिकाणी छत्री घेऊन उभे आहे. तर पोलीस कर्मचारी हातामध्ये झाडाची फांदी घेऊन सासलेल्या पाण्याचा मार्ग करून देत आहे. या फोटो बाबत अधिक माहिती घेतली असता हा फोटो प्राधिकरण निगडी भागातील असल्याचे दिसून आले. फोटोमधील महिला अधिकारी यांचे नाव विजया कारंडे आहे तर दीपक तांदळे असे दुसरे पोलीस कर्मचाऱ्यांची नाव आहे. विजया कारंडे या निगडी येथे वाहतूक विभागात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत आहे.

सविस्तर माहिती अशी की पिंपरी चिंचवड शुक्रवार (ता.४) रोजी सायंकाळी सहा वाजण्याची सुमारास मुसळधार पाऊस झाला. दहा ते वीस मिनिटांच्या कालावधी वादळी वाऱ्यासह बसलेल्या या अवकाळी पावसाने सर्वत्र पाणी पाणी झाले. रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले तर अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा झाला नसल्यामुळे जागोजागी पाण्याची मोठी मोठी डबकी साचली, गटारी, नाले, चेंबर तुबंले या दरम्यान निगडी वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजया कारंडे व पोलीस कर्मचारी दीपक तांदळे हे सायंकाळी निगडी प्राधिकरण आकुर्डी रेल्वे स्टेशन मार्गे पेट्रोलिंग करीत असताना, तिथे रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात पावसाची पाणी साचले असल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे वाहन चालवताना अडचण निर्माण होऊन वाहतुकीला खोळंबा होऊ शकतो. वाहतूक कोंडी होऊ शकते हे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी पावसाने देखील जोर धरला होता त्यांनी कोणताही क्षणाचाही विलंब न करता पोलीस कर्मचारी दीपक तांदळे यांच्या मदतीने साचलेल्या पाण्याचा निचरा केला. विशेष बाब म्हणजे यावेळी त्यांच्याकडे कोणतेही साधन सामग्री उपलब्ध नव्हती. केवळ झाडाच्या एका फांद्यांनी पाण्याला वाट करून दिली.

गेल्या आठवडभर हुलकावणी देणाऱ्या पावसाने आज पिंपरी चिंचवडला झोडपून काढले. त्यामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आहे. उन्हाळ्यामुळे हैराण झालेले पिंपरी चिंचवडकर यांना या अवकाळी पावसाने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे .वाहतुकीचा खोळंबा होऊ नये ,म्हणून अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपले कर्तव्य पार पाडले.

माझे काम नाही हे पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे काम आहे. महापालिका प्रशासन जबाबदार आहे. असा कांगावा करून नेहमी हात वर करणाऱ्याच्य डोळ्यात अंजन घालणारे आजचे हे उदाहरण आहे. पदाचा तसेच अधिकाराचा गर्व न बाळगता केवळ नागरिकांना त्रास होऊ नये या भावनेपोटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजया कारंडे आणि पोलीस कर्मचारी दीपक तांदळे यांनी आपले कर्तव्य बजावले.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

19 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

19 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

22 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

22 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

1 day ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

1 day ago