नाशिक : जिल्हयात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नाशिककरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. जिल्हयातील धरण प्रकल्पांत ९३ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक:- राज्यात आणि जिल्हात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. आता पण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने १९ धरणांमधून विसर्ग करावा लागत आहे. गेल्या वर्षीच्या जलसाठयाचा विचार करता यंदा ३७ टक्के अधिक जलसाठा आहे. मराठवाडयातील जायकवाडी धरण १०२ टीएमसी क्षमतेचे आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत नांदूरमध्यमेश्वरमधून जायकवाडीकडे तब्बल ६४ टीएमसी पाणी प्रवाहित झाले आहे.

जूनमध्ये प्रतीक्षा करायला लावणार्‍या पावसाने जुलैत संपूर्ण कसर भरून काढली. तेव्हापासून आतापर्यंत कमी-अधिक प्रमाणात पाऊस कोसळत आहे. यामुळे वर्षभरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. महिनाभरात इतका पाऊस झाला की, बहुतांश धरणे तुडुंब होऊन त्यातून अतिरिक्त पाणी सोडावे लागत आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणात सध्या ५३३७ दशलक्ष घनफूट (९५ टक्के) जलसाठा झाला आहे. याच धरण समूहातील काश्यपीत (९९), गौतमी गोदावरी (९९), आळंदी (१००) असा जलसाठा आहे. पालखेड (६९), करंजवण (८३), पुणेगाव (९१), दारणा (९८), मुकणे (९८), कडवा (९०), चणकापूर (७८), गिरणा (९२), पुनद (८२) आणि माणिकपुंज धरणात (७१) टक्के जलसाठा आहे. वाघाड, ओझरखेड, तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर ही धरणे कधीच तुडुंब भरून ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यातील २४ धरणांमध्ये सध्या ६० हजार ९३१ दशलक्ष घनफूट (९३ टक्के) जलसाठा आहे. गतवर्षी हेच प्रमाण ५७ टक्के होते.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

महाराष्ट्रातील महायुती सरकारची कोंडी, सरकारने आचार संहितेच्या उल्लंघन केल्या बाबत चौकशी सुरू.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…

8 hours ago

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

10 hours ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

1 day ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

1 day ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago