नागपुर शहरात इमारतीच्‍या पार्किंगमध्‍ये सुरू होता अवैध प्रतिबंधित तंबाखूचा कारखाना…

संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- शासनाने सर्व प्रकारच्या सुगंधित तंबाखूची विक्री करण्याचा प्रतिबंध केला आहे. तरी नागपुर शहरातील एका बिल्‍डींगच्‍या पार्किंगमध्‍ये अवैधरित्‍या तंबाखूचा कारखाना मागील अनेक दिवसापासून सुरू होता. या कारखान्‍यावर नागपूर गुन्हे शाखेच्‍या पथकाने छापा टाकून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्‍त केला आहे. त्यामुळे अवैध तंबाखू गुटखा विक्री करणाऱ्याचे चांगलेच धागे दणकावले आहे.

नागपूर शहरातील लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीतील येनुरकर बिल्डिंगमध्ये पार्किंग परिसरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा कारखाना सुरू होता. नागपूर गुन्हे शाखेला ही माहिती मिळताच या कारखान्यावर छापा टाकून कारसह 18 लाख किमतीचा सुगंधित तंबाखूचा साठा पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी आरोपी रुपेश नंदनवार व दत्तू सराटकर यांना अटक करण्यात आली आहे.

यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत तंबाखूनी भरलेले 22 पोटे मिळून आले. या सुगंधित तंबाखूची किंमत 12 लाख रुपये एवढी आहे. या कारखान्याच्या सूत्रधार दुर्गेश अग्रवाल असून गेल्या काही महिन्यांपासून दुर्गेश प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा कारखाना चालवित होता. या ठिकाणाहून पोलिसांनी कार, सुगंधित तंबाखू, मशीन, रिकामी पाकिटे, झाकन आदी साहित्य जप्त केले आहे. तर या कारखान्याच्या सूत्रधार दुर्गेश अग्रवाल फरार असून त्याच्या शोध पोलीस घेत आहेत.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

18 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

18 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

21 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

21 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

1 day ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

1 day ago