सातारा जिल्हा प्रतिनिधी
सातारा:- येथून एक खळबळ जनक घटना समोर आली आहे. एका युतीवर एका नराधमाने जादूटोण्याचा बनाव करत जबरदस्तीने बलात्कार करण्यात आला असून बलात्कार करण्यापूर्वी या युवतीच्या डोक्यावर लिंबू फिरवून जादूटोणा करण्यात प्रयत्न झाला. ही संतापजनक बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील पीडित युवतीने पोलिसाना दिलेल्या तक्रारी मध्ये धक्कादायक आरोप केला आहे. युवतीने दिलेल्या तक्रारीत लावलेल्या आरोपांच्या आधारे आता पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे. तसेच संशयित आरोपी असलेल्या नराधमास पोलिसांनी अटक करून बेळ्या ठोकल्या आहे.
सातारा येथील एका वसाहातीत हा संतापजनक प्रकार घडला आहे. साताऱ्यातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात या बलात्कार प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली असून अधिक तपास केला जातो आहे.
सातारा येथे राहणाऱ्या मुक्तार नासीर शेख या युवकाने एका युवतीला एकटीला आपल्याबरोबर रुममध्ये नेलं. त्यानंतर तिच्या डोक्यावरुन लिंबू फिरव्हायला सुरुवात केली त्यानंतर तिला अचानक भुरळ पडली त्यानंत तिच्यावर जबरदस्ती करत बलात्कार करण्यात आला. असे पीडित युवतीने आपल्या जबाबात या संपूर्ण प्रकाराचा संतापजनक घटनाक्रम सांगितला आहे. पोलिसांनीही या तक्रारीची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करुन घेतला आहे. सध्या सातारा पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
साताऱ्यात उघडकीस आलेल्या या संतापजनक बलात्कार प्रकरणानंतर पोलिसांनी 375 आणि 201(3) प्रमाणे संशयित आरोपी असलेल्या मुक्तार नासीर शेख याच्यावर गुन्हा नोंदवून घेतलाय. पीडितेने केलेल्या आरोपांनंतर मुक्तान शेख याला पोलिसांनी ताब्यातही घेतलं असून त्याची कसून चौकशी आता केली जाते आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण साताऱ्यात खळबळ माजली आहे. या घटनेनंतर मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, याआधीही नासीर शेख यांनी अशाचप्रकारे इतरही युवती बरोबर गैरकृत्य केलेलं असण्याचीही भीती व्यक्त केली जाते आहे. त्या अनुशंगाने पोलिसांकडून पुढील तपास केला जातो आहे. या तपासातून आता नेमकी काय माहिती समोर येते, हे पाहणंही महत्त्वाचंय.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…