नागरी वस्तीत शिकार करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्याचा वनमंत्र्यांनी दिला आदेश.

नागरी वस्तीतील हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत, दोन पिंजरे लावून पकडण्याचे प्रयत्न

सौ.हनिशा दुधे, तालुका प्रतिनिधी बल्लारपूर

बल्लारपूर:- मागील एक वर्षापासून जुन्या पॉवर हाउस

परिसरात बिबट्याचा वावर सुरू आहे. त्याने शेतकऱ्यांची अनेक पाळीव जनावरे ठार केली व त्या रत्याने ये जा करणाऱ्या नागरिकांवरही हल्ले करू लागला आहे व आता तो नागरी वस्तीत येऊन पाळीव प्राण्यांची सुद्धा शिकार करू लागला असल्याने व त्याचे दिवसान दिवस हल्ल्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याने व नुकतेच त्याने गावातील वार्ड क्र.५ मध्ये येऊन बकरीची शिकार केल्याने समोर कोणतेही अनुचित घटना घडू नये म्हणून वेळीच विसापूर गावकऱ्यांच्या मागणीची दाखल घेत नव नियुक्त वनमंत्री व चंद्रपूर जिह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बिबट्याला जेरबंद करण्याचा आदेश वन विभागाला दिला.

विसापूरच्या या हद्दीत या आज घडीला तालुका क्रीडा संकुल, बॉटनिकल गार्डनची निर्मिती करण्यात आली आहे व ७० ते ८० एकर परीसर हा अजूनही ओसाड पडला आहे पडके क्वार्टर, घनदाट झुडपे बारमाही वाहणारा नाला व शेतकऱ्यांची पाळीव जनावरे येथे चरायला येत असल्याने बिबट्याने याच परिसरात आपले बस्तान मांडले आयती शिकार मिळत असल्याने तो बिनधास्त झाला या पूर्वी विसापूरकरांना,क्रीडा संकुल परिसरात बिबट्याचे हल्ले अधून मधून सुरच होते परंतु मागील दोन महिन्यापासून हल्ल्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणत वाढले.आता तो दिवस ढवळ्या नागरी वस्तीत येवून हल्ले करू लागला आहे. याबाबत वेळोवेळी ग्रामपंचायतीने संबधित विभागाशी पत्र व्यवहार करून त्याला जेरबंद करण्याची मागणी केली तसेच बल्लारपूर तालुक्याचे भाजपा अध्यक्ष किशोर पंदीलवार व भाजपा युवा मोर्चाचे उपजिल्हाध्यक्ष संदीप पोडे यांनी वनमंत्री मुनगंटीवार यांना परिस्थितीची जाणीव करून दिली त्यामुळे वनमंत्र्यानी त्याला जेरबंद करण्याचा तात्काळ आदेश दिला.

  • बल्लारपूर तालुक्यातील विसापूर हद्दीतील पॉवर हाऊस परिसरात बिबट्याच्या हल्यामुळे नागरीकांन मध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली असल्याने त्या बाबत वरिष्ठना त्याला जेरबंद करण्याची परवानगी मागितली होती. ती मिळाल्यामुळे परिसरात दोन पिंजरे लावण्यात आले आहे ho व त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी चार ट्रप कॅमेरे लावण्यात आले आहे.
    नरेश भोवरे ,वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) बल्लारशाह
प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

5 hours ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

6 hours ago