नागरी वस्तीतील हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत, दोन पिंजरे लावून पकडण्याचे प्रयत्न
सौ.हनिशा दुधे, तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
बल्लारपूर:- मागील एक वर्षापासून जुन्या पॉवर हाउस
विसापूरच्या या हद्दीत या आज घडीला तालुका क्रीडा संकुल, बॉटनिकल गार्डनची निर्मिती करण्यात आली आहे व ७० ते ८० एकर परीसर हा अजूनही ओसाड पडला आहे पडके क्वार्टर, घनदाट झुडपे बारमाही वाहणारा नाला व शेतकऱ्यांची पाळीव जनावरे येथे चरायला येत असल्याने बिबट्याने याच परिसरात आपले बस्तान मांडले आयती शिकार मिळत असल्याने तो बिनधास्त झाला या पूर्वी विसापूरकरांना,क्रीडा संकुल परिसरात बिबट्याचे हल्ले अधून मधून सुरच होते परंतु मागील दोन महिन्यापासून हल्ल्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणत वाढले.आता तो दिवस ढवळ्या नागरी वस्तीत येवून हल्ले करू लागला आहे. याबाबत वेळोवेळी ग्रामपंचायतीने संबधित विभागाशी पत्र व्यवहार करून त्याला जेरबंद करण्याची मागणी केली तसेच बल्लारपूर तालुक्याचे भाजपा अध्यक्ष किशोर पंदीलवार व भाजपा युवा मोर्चाचे उपजिल्हाध्यक्ष संदीप पोडे यांनी वनमंत्री मुनगंटीवार यांना परिस्थितीची जाणीव करून दिली त्यामुळे वनमंत्र्यानी त्याला जेरबंद करण्याचा तात्काळ आदेश दिला.
- बल्लारपूर तालुक्यातील विसापूर हद्दीतील पॉवर हाऊस परिसरात बिबट्याच्या हल्यामुळे नागरीकांन मध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली असल्याने त्या बाबत वरिष्ठना त्याला जेरबंद करण्याची परवानगी मागितली होती. ती मिळाल्यामुळे परिसरात दोन पिंजरे लावण्यात आले आहे ho व त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी चार ट्रप कॅमेरे लावण्यात आले आहे.
नरेश भोवरे ,वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) बल्लारशाह