देव गेला चोरीला, आता अख्ख गाव सोडणार अन्न पाणी.

जालना जिल्हा प्रतिनिधी
जालनाः-
जील्हातून एक खळबजनक बातमी समोर आली आहे. जालना जिल्ह्यातील जांब समर्थ येथील रामदास स्वामींनी पूजलेल्या प्राचीन देवाच्या मुर्त्या चोरांनी चोरून नेल्यामुळे अवघ्या गावात शांतता पसरली आहे.

रविवारला रात्रीच्या सुमारास जांब येथील राम मंदिरातील पंचधातूंच्या 450 वर्षांपूर्वीच्या प्राचीन देवाच्या मुर्त्या चोरीला गेल्यात. पण मंगळवारी सकाळपर्यंत या मूर्तींचा किंवा चोरट्याचा शोध लागलेला नाही. महाराष्ट्रातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या रामदास स्वामी यांच्या जन्मगावीच ही चोरीची घटना घटल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता आहे. लवकरात लवकर मूर्तींचा शोध लागला नाही तर अवघा गाव अन्नत्याग करणार असल्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. या चोरीच्या घटनेमुळे जांब समर्थ गावासह संपूर्ण जालना जिल्ह्यात अस्वस्थता आहे. जांब समर्थ गावात प्रचंड शुकशुकाट पहायला मिळतोय. मंदिरातील एकूण पाच ते सहा मूर्ती चोरीला गेल्यात. मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने तात्पुरता श्रीरामाचा दुसरा फोटो ठेवून त्याची पूजा करण्यात येतेय, मात्र आमला देव हरवल्याच्या भावनेने गावकरी व्याकुळ आहेत.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

सांगलीतील उद्योजक कुटुंबाचा बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…

24 mins ago

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

5 hours ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

7 hours ago