जालना जिल्हा प्रतिनिधी
जालनाः- जील्हातून एक खळबजनक बातमी समोर आली आहे. जालना जिल्ह्यातील जांब समर्थ येथील रामदास स्वामींनी पूजलेल्या प्राचीन देवाच्या मुर्त्या चोरांनी चोरून नेल्यामुळे अवघ्या गावात शांतता पसरली आहे.
रविवारला रात्रीच्या सुमारास जांब येथील राम मंदिरातील पंचधातूंच्या 450 वर्षांपूर्वीच्या प्राचीन देवाच्या मुर्त्या चोरीला गेल्यात. पण मंगळवारी सकाळपर्यंत या मूर्तींचा किंवा चोरट्याचा शोध लागलेला नाही. महाराष्ट्रातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या रामदास स्वामी यांच्या जन्मगावीच ही चोरीची घटना घटल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता आहे. लवकरात लवकर मूर्तींचा शोध लागला नाही तर अवघा गाव अन्नत्याग करणार असल्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. या चोरीच्या घटनेमुळे जांब समर्थ गावासह संपूर्ण जालना जिल्ह्यात अस्वस्थता आहे. जांब समर्थ गावात प्रचंड शुकशुकाट पहायला मिळतोय. मंदिरातील एकूण पाच ते सहा मूर्ती चोरीला गेल्यात. मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने तात्पुरता श्रीरामाचा दुसरा फोटो ठेवून त्याची पूजा करण्यात येतेय, मात्र आमला देव हरवल्याच्या भावनेने गावकरी व्याकुळ आहेत.