गडचिरोली: न्यायाधीशांना घरी जाऊन धमकावल्याच्या प्रकरणात वादग्रस्त पोलीस निरीक्षकाला अखेर पोलिसांनी केली अटक.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- न्याय दानाचे पवित्र काम करणाऱ्या न्यायाधीश यांना पोलीस निरीक्षकाने धमकवल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी न्यायाधिशांना धमकी देणाऱ्या पोलीस निरीक्षकांना गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षक राजेश खांडवेला विरोधात आदेश देणाऱ्या न्यायाधीशांना घरी जाऊन धमकावले होते वादग्रस्त पोलीस निरीक्षक राजेश खांडवेला अखेर पोलिसांनी अटक केली. यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्या नंतर त्याची चंद्रपूरच्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

चामोर्शी बाजार समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत 20 एप्रिल रोजी पहाटे पोलीस स्टेशन मध्ये बोलावून लाथाबुक्क्या व बुटाने मारहाण केल्याचा दावा सभापती अतुल गण्यारपवार यांनी पोलीस निरीक्षक राजेश खांडवेवर केला होता. खांडवेवर गुन्हा नोंदविण्यासह बडतर्फीच्या कारवाईसाठी चामोर्शीत आंदोलन झाले होते. त्यानंतर गण्यारपवारांनी चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाद मागितली.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. डी. मेश्राम यांनी 20 मे रोजी राजेश खांडवेवर कलम 294, 324, 326, 342 भादंविनुसार गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. दरम्यान, 25 मे रोजी सकाळी खांडवे हा न्या. मेश्राम यांच्या निवासस्थानी गेला. माझ्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचा आदेश का दिला, अशी विचारणा केली. त्यावर समजावण्याचा प्रयत्न केला. आपिलात जाण्याची संधी आहे, असे न्या. मेश्राम यांनी समजावले. मात्र, त्यानंतर खांडवेने हुज्जत घालून धमकावल्या प्रकरणी पो. नि. खांडवे विरुध्द कलम 323, 353, 452 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

केलं तडकाफडकी निलंबन
या घटनेनंतर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी तातडीने वेगवान हालचाली केल्या. न्या. मेश्राम यांची गडचिरोली ठाण्यात फिर्याद नोंदवून गुन्हा चामोर्शी ठाण्यात वर्ग केला, त्यानंतर पोलीस निरीक्षक खांडवेला तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते.

आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348-7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

17 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

17 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

20 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

20 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

24 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

1 day ago