मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक,दि.24ऑगस्ट:- आज भारतात कुठलेही शासकीय कामासाठी लाच मागितली जाते. हे मागील अनेक घटनेवरून समोर येत आहे. अशीच एक खळबजनक घटना नाशिक मधून समोर आली आहे. नाशिक येथील एका बड्या अधिकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली आहे. लाचेचा भस्म्या रोग जळलेल्या या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं आहे.
नाशिक येथील मुख्य प्रशासकीय अधिकारी गजानन मारुतीराव लांजेवार हा लाचखोर अधिकाऱ्याने जिल्हा परिषदेतील सेवा निवृत्त वैद्यकीय अधिकारी असलेले व्यक्तीचे रजा रोखीकरणाचे 15 लाखाचे बिल मंजूर करण्यासाठी लांजेवार याने 20 हजारांची लाच मागितली होती. या प्रकरणी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.
नाशिक येथे मुख्य प्रशासकीय अधिकारी पदावर कार्यरत असलेले गजानन मारुतीराव लांजेवार यांनी एका सेवा निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याकडे लाचेची मागणी केली होती. या अधिकाऱ्याचे रजा रोखीकरणाचे 15 लाखाचे बिल मंजूर करायचे होते. त्यासाठी संबंधित अधिकारी लांजेवार यांच्याकडे गेली होती. पण लांजेवार यांनी बिल मंजूर करण्यासाठी पैशांची मागणी केली. लांजेवार यांनी बिल मंजूर करण्यासाठी चक्क 20 हजार रुपये मागितले होते. पर्याय नसल्याने पीडित अधिकाऱ्याने लाच देण्यास होकार दिला होता.
आरोपी अधिकाऱ्याला लाचेचा भास्म्या रोग जळला असून त्याच्या लाचखाऊन मुजोर कारभाराविरोधात कारवाई व्हायला हवी, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यातून त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार करण्याचा विचार मनात आला. त्यांनी त्यानुसार एसीबी कार्यालयात जावून तक्रार दाखल केली. एसीबी अधिकाऱ्यांनी संबंधित तक्रारीची दखल घेत कारवाईला सुरुवात केली.
एसीबी अधिकाऱ्यांनी सापळा रचला. एसीबी अधिकारी आणि पोलिसांनी पीडित तक्रारदाराला लाचेचे पैसे देण्यास सांगितलं. त्यानुसार त्यांनी पैसे देवू केले. नेमकं त्याचवेळी एसीबी अधिकाऱ्यांनी धाड टाकली. अशाप्रकारे एसीबी अधिकाऱ्यांनी मुख्य प्रशासकीय अधिकारी गजानन मारुतीराव लांजेवार यांना रंगेहात अटक केली.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…