नाशिक: वावी येथे बंटी बबली ने केली दुकानदारांची ऑनलाईन फसवणूक, पोलिसांनी ठोकल्या बेळ्या.


✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी✒️

नाशिक:- आज सर्विकडे ऑनलाईन खरेदी विक्रीचे मोठे स्टेन्ड दिसून येत आहे. त्यात फसवणुकीचे अनेक प्रकरणे रोज समोर येत असतात. असेच एक घटना वावी येथील दुकानदाराची फोन पे द्वारे फसवणूक करून लूट करणार्‍या दोघा भामट्यांना दोन तासांत वावी पोलिसांनी अटक केले आहे. वावी गावात बसस्थानकाजवळ संतोष बाळकिसन जोशी यांचे अवधुत मशीनरी स्टोअर्स आहे. शनिवारी दि.27 दुपारी दोन वाजता एक इसम व एक महिला दुकानात आले. त्यांनी जोशी यांच्याकडे औषध मारण्याचा बॅटरी पंप विकत घ्यायचा आहे, असे सांगून एक बॅटरीवरील पंप विकत घेतला. त्याचे 2750 रुपये फोन पे ला सेंड करतो, असे सांगून 2750 रुपये जोशी यांच्या खात्यावर सेंड न करता इतर कोणाच्या तरी खात्यावर सेंड करून त्याचा स्क्रीन शॉट दाखवला. पैसे सेंड केले आहे सांगून दुकानातून निघून जात असताना जोशी यांनी त्यांना आवाज देऊन पैसे सेंड झाले नाही असे सांगत असताना ते त्यांच्या मोटरसायकलवर बसून जोरात निघून गेले.

जोशी यांनी सदरचे सीसीटीव्ही फुटेज काढून वावी पोलिस ठाण्यात आणून दिले. संतोष जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित मयूर केशव कार्ले वय 28 वर्ष, रा. कसारे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर व शारदा संतोष आराध्ये वय 27 वर्ष, रा. सरदवाडी रोड, सिन्नर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला व तपासाची चक्रे फिरवली. अवघ्या दोनच तासांत या दोघांच्या मुसक्या आवळत जोशी यांच्या अवधूत मशीनरी येथे आणले. त्या दोघांनी आमच्याकडून चुकून झाले माफी मागतो, अशी कबुली दिली.

परंतु वावी पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्यांनी सिन्नरसह परिसरात असे गुन्हे केल्याचे माहिती मिळाली. वावी पोलिसांनी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, त्यांची कसून तपास करत आहे. सहायक पोलिस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

8 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

9 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

9 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

9 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

9 hours ago

अभिनव विचार मंच तर्फे सोपानदादा कनेरकर यांचा कौटुंबिक प्रबोधन जागर जाणिवांचा कार्यक्रमाचे 25 डिसेंबर रोजी आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…

9 hours ago