✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी✒️
नाशिक:- आज सर्विकडे ऑनलाईन खरेदी विक्रीचे मोठे स्टेन्ड दिसून येत आहे. त्यात फसवणुकीचे अनेक प्रकरणे रोज समोर येत असतात. असेच एक घटना वावी येथील दुकानदाराची फोन पे द्वारे फसवणूक करून लूट करणार्या दोघा भामट्यांना दोन तासांत वावी पोलिसांनी अटक केले आहे. वावी गावात बसस्थानकाजवळ संतोष बाळकिसन जोशी यांचे अवधुत मशीनरी स्टोअर्स आहे. शनिवारी दि.27 दुपारी दोन वाजता एक इसम व एक महिला दुकानात आले. त्यांनी जोशी यांच्याकडे औषध मारण्याचा बॅटरी पंप विकत घ्यायचा आहे, असे सांगून एक बॅटरीवरील पंप विकत घेतला. त्याचे 2750 रुपये फोन पे ला सेंड करतो, असे सांगून 2750 रुपये जोशी यांच्या खात्यावर सेंड न करता इतर कोणाच्या तरी खात्यावर सेंड करून त्याचा स्क्रीन शॉट दाखवला. पैसे सेंड केले आहे सांगून दुकानातून निघून जात असताना जोशी यांनी त्यांना आवाज देऊन पैसे सेंड झाले नाही असे सांगत असताना ते त्यांच्या मोटरसायकलवर बसून जोरात निघून गेले.
जोशी यांनी सदरचे सीसीटीव्ही फुटेज काढून वावी पोलिस ठाण्यात आणून दिले. संतोष जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित मयूर केशव कार्ले वय 28 वर्ष, रा. कसारे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर व शारदा संतोष आराध्ये वय 27 वर्ष, रा. सरदवाडी रोड, सिन्नर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला व तपासाची चक्रे फिरवली. अवघ्या दोनच तासांत या दोघांच्या मुसक्या आवळत जोशी यांच्या अवधूत मशीनरी येथे आणले. त्या दोघांनी आमच्याकडून चुकून झाले माफी मागतो, अशी कबुली दिली.
परंतु वावी पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्यांनी सिन्नरसह परिसरात असे गुन्हे केल्याचे माहिती मिळाली. वावी पोलिसांनी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, त्यांची कसून तपास करत आहे. सहायक पोलिस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.