बीड येथे शाळा, ट्युशन व अभ्यासाच्या अतीतणावाने घेतला 9 व्या वर्गातील विद्यार्थिनीचा बळी; वर्गातच आला हृदयविकाराचा झटका.

श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- येथून एक दुर्दैवी आणि काळीज हेलावणारी घटना समोर आली आहे. इयत्ता 9 व्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थीनीचा वर्गातच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. सदर विद्यार्थीनीने काही दिवसांपूर्वीच शाळा, ट्युशन यामुळे ताण येत असल्याचे पालकांना सांगितले होते. त्यावर पालकांनी शाळाही बदलण्याचा निर्णय घेतला होता. तत्पूर्वीच ही घटना घडली. शेख रमशा असे या मुलीचे नाव असून ही शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नववीच्या वर्गात शिक्षण घेत होती.

दिनांक 28 जुलै शुक्रवारला ती नेहमीप्रमाणे शाळेत गेली. वर्गात पहिल्याच क्रमांकाच्या डेस्कवर बसली होती. यादरम्यान तिने डेक्सवरच मान टाकली. तिला तत्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. या संदर्भात मुलीच्या वडिलांशी संपर्क साधला असता त्यांनी घटनेला दुजोरा दिला. गुरुवारी रात्री रमशा शेख ही रात्री १वाजेपर्यंत होमवर्क करत होती. शाळ आणि ट्युशन यामुळे आपल्याला ताण येत असल्याचे तिने पालकांना सांगितले होते. यामुळे त्यांनी शाळा बदलण्याचाही निर्णय घेतला होता. परंतु तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये परीक्षेमध्ये जास्तीतजास्त मार्क मिळवण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांचे जीवन म्हणजे शाळा-कॉलेज आणि शिकवण्या याशिवाय दुसरं काही नसतं. आज प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक सामायिक गोष्ट असते, ती म्हणजे चांगले मार्क मिळवण्याचा ताण. विद्यार्थ्यांच्या मनात मार्कांचं महत्त्व इतकं काही रुजवलेलं असतं, की चांगले मार्क मिळाले नाहीत, तर जणू आयुष्य फोल वाटायला लागतं. याच कारणामुळे त्यांचं आयुष्य शाळा- कॉलेज भोवतीच फिरत राहतं. त्यामुळे अनेक विद्यार्थांनी आत्महत्या सारखं पाऊल उचलले आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

मिरा भाईंदर: माणसाला माणूस बनवण्याचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे वर्षावास: भदंत शांतिरत्न यांचे प्रतिपादन.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…

5 hours ago

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना वाहली श्रद्धांजली.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…

5 hours ago

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…

6 hours ago

पुलगाव येथे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा माल जप्त.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…

6 hours ago

सांगली सेवक कामगार संघटने कडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाबत घेतली भूमिका.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…

7 hours ago

चंद्रपूर: वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…

7 hours ago